पेपर, पोलाद, पेट्रोलियम, फर्टिलायझर कंपन्या, रिफायनरी उद्योगांमधून अधिकाधिक ऑक्सिजन मिळविण्याचा प्रयत्न करावा. अनेक उद्योगांमध्ये ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे बंद स्थितीत आहेत. त्यांचा शोध घेऊन ती संयंत्रे तातडीने दुरुस्त करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकसचिवांनी जिल्हा प्रशासन व मंत्रालयातील दुवा म्हणून जबाबदारी घ्यावी, असे निर्देश देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. यावेळी खालील निर्णय घेण्यात आले.
- ऑक्सिजनप्रकल्प निर्मिती व उभारणीसाठी खरेदीचे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार
- उद्योगांकडून अधिकाधिक ऑक्सिजन मिळविण्याचा प्रयत्न
- उद्योगातील बंद संयंत्रे सुरु करुन ऑक्सिजन निर्मिती वाढवणार
- कोरोनाप्रतिबंधक प्रभावी उपाययोजनांसाठी पालक सचिवांवर आता अधिक जबाबदारी
- किराणा खरेदीसाठी दिवसभर बाहेर पडणाऱ्यांमुळे दुकाने सकाळी सात ते अकरापर्यंतच खुली