शेवगाव (MBP LIVE 24) :
शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे आणि बोधेगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परदेशी यांच्या निष्क्रिय कारभाराबाबत मंगळवारी (ता. 11) प्रसिध्द केलेल्या बातमीबद्दल शेवगावकरांनी 'MBP LIVE 24'चे मनःपूर्वक अभिनंदन केले. याबरोबरच समस्त सोशल मीडियावर उत्स्फूर्तपणे आक्रमक प्रतिक्रिया देऊन या दोन्ही डॉक्टरांच्या बेजबाबदार, संशयास्पद आणि बेकायदेशीर कारभाराची लक्तरे शेवगावकरांनी अक्षरशः वेशीवर टांगली.
तक्रारींचा पाऊस
शेकडो व्हाट्सएप ग्रुप व फेसबुक पेज वर संताप व्यक्तशेवगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो व्हाट्सएप ग्रुपवर आणि फेसबुक पोस्ट, ग्रुप व पेजवर दिवसभर अक्षरशः तक्रारींचा पाऊस पडलाय. डॉ. काटे आणि डॉ. परदेशी दोनही डॉक्टरांच्या बेजबाबदार वर्तणुकीचा घेत असलेला अनुभव शेकडो शेवगावकरांनी निर्भीडपणे थेट लिहून व्यक्त केलाय. त्यामुळे शेवगाव आणि बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेला अनागोंदी कारभार आणि त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची होणारी शारीरिक, मानसिक छळवणूक आणि आर्थिक पिळवणूक समोर आली आहे. हा बेजबाबदार कारभार थांबवून या दयनीय परिस्थितीस जबाबदार असणारे डॉ. काटे आणि डॉ. परदेशी यांच्यासह इतर आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी केली आहे. ('MBP LIVE 24' काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया फोटोच्या माध्यमातून प्रसारित करत आहे.)
जिल्हाधिकारी साहेब..! यांना पाठीशी कोण घालतंय?
शासकीय आरोग्य विभागातील अशा बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणारे कोण, असा सवाल शेवंगावकरांनी उपस्थित केला आहे. अशा महाभागांनाही जनता आता माफ करणार नाही, अशा तीव्र भावना सर्वसामान्य जनतेच्या आहेत. सर्वसामान्य जनतेचा अंत आता पाहू नये, असा इशाराच जनतेने दिला आहे. अन्यथा अति झाल्याने संयमाचा विस्फोट झाल्यास जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहील. याची दखल जिल्हाधिकारी भोसले यांनी घेऊन कारवाईची पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
डॉ. परदेशी असतात कुठे?
बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात सुविधा मिळत नसल्यामुळे डॉ. परदेशी यांचा निषेध बोधेगाव व परिसरातील नागरिकांनी सोशीलमेडियावर व्यक्त केला आहे. तसेच नियुक्ती झाल्यापासून डॉ. परदेशी बोधेगाव ला असतात कधी, असा सवाल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबरोबरच बोधेगाव येथे नियुक्तीनंतर ते शेवगाव मधील अथर्व हॉस्पिटलमध्येच रोज पूर्णवेळ प्रॅक्टिस करत असल्याचे आम्ही डोळ्याने पहातोय, त्यामुळे सरकारी पगार घेऊन सर्वसामान्य रुग्णांच्या डोळ्यात धूळफेक करणे थांबवा.डॉ. काटेच्या खासगी प्रॅक्टिस वर तीव्र नाराजी
शेवगाव ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदी कारभाराची लक्तरे काल शेवगावकरांनी वेशीवर टांगली. डॉ. काटे यांच्या कारभारावर तीव्र आणि तिखट प्रतिक्रिया देऊन त्यांच्या खासगी स्कॅन सेंटरमधील प्रॅक्टिस बाबत नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण रुग्णालय उघड्यावर सोडून डॉ. काटे खासगी प्रॅक्टिस व्यक्त करत असल्याचा संताप थेट 'श्री सोनोग्राफी' मधील त्यांच्या कबिनचे फोटो सोशीलमेडियावर टाकून व्यक्त केलाय.जिल्हाधिकारी, आरोग्यमंत्री, मुख्यमंत्रीयांना शेवगाव करांचे साकडेशेवगाव शहरासह तालुक्यात आरोग्य सेवेची पुरती वाट लागलेली आहे. कोविड उपचार मिळत नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांची आर्थिक लूट सुरू आहे. याला सर्वस्वी जबाबदार या दोनही डॉक्टरसह जबाबदार इतर अधिकारी व कर्मचारी यांना स्थानिक जबाबदार अधिकारी नेहमी पाठीशी घालत आहेत. शेवगाव मध्ये कायद्याचा धाक उरलेला नसल्याने अनागोंदी पसरली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सर्वांवर जिल्हाधिकारी, आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री यांनी तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आम्हालाच कायदा हातात घ्यावा लागेल, अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेने सोशलमेडिया आणि 'MBP LIVE 24'कडे व्यक्त केल्या आहेत.