डीवायएसपीच्या पथकातील 'ते' लाचखोर पोलिस गेले कुठे?

अहमदनगर - वाळू व्यवसायिकाकडे लाच मागितली म्हणून दोन पोलिसांवर गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे हे कर्मचारी बेकायदा धंद्यांवर कारवाईसाठी स्थापन केलेल्या विशेष पथकात होते. शेवगावचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकात हे कर्मचारी होते. गुन्हा दाखल झाल्यापासून हे पोलिस फरार आहेत.

वसंत कान्हु फुलमाळी (वायरलेस ऑपरेटर, रा. पाथर्डी), संदीप वसंत चव्हाण व कैलास नारायण पवार (दोघे विशेष पथकातील कर्मचारी, रा. पाथर्डी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकात हे कर्मचारी होते. एप्रिल महिन्यात या पथकाने वाळू वाहतूक करणारे एक वाहन पकडले होते.

वाहनावर कारवाई न करता सोडून देण्यासाठी आणि पुढे हा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी त्यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, पाथर्डी येथील ठेकेदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. सोबत रेकॉर्डिंगचे पुरावेही दिले. त्यानंतर पोलिस दलात उलटसुलट चर्चा सुरु झाली.

यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापैकी एका कर्मचाऱ्याची तत्काळ मुख्यालयात बदली केली. परंतु, तोवर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे लाचलुचपतचे पथक आरोपी पोलिसांना पकडायला गेले. परंतु, ते मिळून आले नाहीत. त्यांच्या घरीही झडती घेण्यात आली. पण काही सापडले नाही.

आरोपी का सापडत नाहीत ?

एरव्ही खतरनाक गुन्हेगारांच्या मुसक्या पोलिस तातडीने आवळतात. या गुन्ह्यात तर तीन पोलिसाांवरच गुन्हा दाखल झाला आहे. तरीही अद्याप ते परागंदा आहेत. लाचलुचपत विभागाला हे लाचखोर पोलिस का सापडत नाहीत, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !