धक्कादायक ! मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या व्हिडीओत 'हे' म्हणाला अभिनेता राहुल वोहरा


नवी दिल्ली (MBP LIVE 24) - कोरोना संसर्गामुळे सामान्य जनतेसहीत अनेक कलाकारांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच लोकप्रिय यूट्यूबर व अभिनेता राहुल वोहराच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. काही दिवसांपासून राहुल दिल्लीच्या एका रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत होता. निधनापुर्वीच्या राहुलच्या पोस्टने एकच खळबळ उडाली होती.

स्वतःच्या मृत्यूची फेसबुक पोस्ट 

निधनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच 8 मे रोजी राहुल वोहरा याने फेसबुक पोस्ट द्वारे मृत्यूचे संकेत दिले होते. “मलाही चांगले उपचार मिळाले असते तर मी सुद्धा वाचू शकलो असतो. लवकरच मी दुसरा जन्म घेईल आणि चांगलं काम करेन. तुमचाच राहुल वोहरा” असे राहुलने मृत्यूपूर्वी धक्कादायक पोस्ट केली होती.

 
उपचारांवर प्रश्नचिन्ह

 

राहुलच्या या पोस्टमुळे दिल्लीच्या दवाखान्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असतानाच त्याची पत्नी ज्योती तिवारी राहुलचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ राहुलचा शेवटचा व्हिडिओ असून त्यात तो आपल्याला व्यवस्थित ऑक्सिजन देत नसल्याचा आरोप करताना दिसून येत आहे. 

दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना सांगून देखील ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित केला नसल्याचा राहुल आरोप करताना दिसून आला.


पत्नीने सांगितले मृत्यूचे कारण

राहुलची पत्नी ज्योतीने पोस्ट मध्ये असे लिहिले, “माझा नवरा मेला हे सर्वांना माहिती आहे. परंतु, तो कसा गेला हे कोणालाच माहिती नाही. राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ताहीरपुर दिल्ली मध्ये अशा प्रकारे उपचार चालू आहे. मी आशा करते की, माझ्या पतीला न्याय मिळावा.” ज्योतीच्या या पोस्टमुळे देशभरात खळबळ माजली असून दवाखान्यावर कारवाही होणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !