शेवगाव, बोधेगाव ग्रामीण रुग्णालय व्हेंटिलेटरवर
लोकामान्य स्कॅन सेंटर, आथार्व हॉस्पिटलमध्ये भागीदारी असल्याचा आरोप
तहसीलदार, जिल्हाशल्यचिकित्सक, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
शेवगाव - शेवगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक रामेश्वर काटे व बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परदेशी हे दोघेही सरकारी नोकरीत आहेत. तरीही ते बेकायदेशीरपणे पूर्णवेळ खासगी प्रॅक्टिस करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या डॉक्टरांची चौकशी करण्याची मागणी कुद्दुस बिबन पठाण यांनी तहसीलदार, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे. या दोघां डॉक्टरांच्या बेजबाबदार वर्तणुकीचा मानसिक, शारीरिक व आर्थिक फटका गरीब, गरजू रुग्णांना बसत आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कुद्दुस पठाण यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे, की डॉ. रामेश्वर काटे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून सरकारी सेवेत पगार घेत असताना ते खासगी युनिटी स्कॅन सेंटरमध्ये पूर्णवेळ काम कसे काय करू शकतात? तसेच ते या ठिकाणी डायरेक्ट बॉडीत आहेत काय? आणि असतील तर त्यांना कायद्याने तशी परवानगी आहे काय, असा सवाल केला आहे.
याशिवाय डॉ. दीपक परेदेशी हे देखील बोधेगाव येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना ते अथर्व हॉस्पिटलमध्येच त्यांची पूर्णवेळ बालरोगतज्ज्ञ म्हणून ओपीडी पहातात. तसेच येथे फिजिशियन म्हणून देखील कार्यरत असल्याने त्यांना कायदेशीर परवानगी आहे काय? असा सवाल उपस्थित केला आहे.
कोरोना संकटात हे दोघेही वैद्यकीय अधिकारी खासगी उद्योगात व्यस्त असल्याने तालुक्यातील गरजू रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. तसेच त्यांची बेकायदेशीर खासगी प्रॅक्टिस बंद करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोरोना काळात आपले नियुक्ती चे ठिकाणीच हजर रहावे, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढलेले आहेत. मात्र तसे असताना डॉ. परेदेशी बोधेगाव सोडून कायम शेवंगावमध्येच असतात. ते राहायला देखील शेवगाव मध्ये आहेत.
आथार्व हॉस्पिटलच्या डायरेक्टर बॉडीत कोण ? शेवगाव शहरातील डॉ. विकाश बेंडके यांनी गेल्या काही वर्षा पासून सुरु केलेल्या हॉस्पिटलमध्ये डायरेक्टर बॉडीमधील नावाची यादी व त्यांच्या खासगी कोविड सेंटर मधील बॉडीतील नावाची यादी मिळावी, यासाठी देखील पठाण यांनी तहसीलदार व जिल्हाशल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार अर्ज केला आहे. हॉस्पिटलच्या बॉडीमध्ये सरकारी नोकरीत असणारे काही जण असल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. ज्या व्यक्ती सरकारी यंत्रनेमध्ये पगारी डॉक्टर म्हणून काम करीत असतील तर त्यांना अश्या प्रकारे कुठल्याही खासगी हॉस्पिटलमध्ये भागीदार अथवा इतर जबाबदारीवर काम करण्याची कायदेशीर परवानगी नाही. तसेच या हॉस्पिटलमध्ये फिजिशिअन डॉक्टर म्हणून कोणाची नियुक्ती आहे याची माहिती देखील मागितली आहे.
उद्या वाचा...
अधिकाऱ्याशी तडजोड करणारा बोधेगावचा 'तो' डॉक्टर कोण ?