नाशिक - शहरातील जुने नाशिक मधील महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे दगावलेल्या २२ रुग्णांच्या (मृतांमध्ये ११ पुरुष आणि ११ महिलांचा समावेश) नातेवाईकांना मनपाकडूनही ५ लाखांची मदत घोषित केली आहे. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या उपस्थितीत ही माहिती दिली. राज्य सरकार कडूनही प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.