अहमदनगर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. दोन दिवसांपासून दैनंदिन आढळणारी बाधित रुग्णांची संख्या आता एक हजारांच्या आत आली आहे. पण गुरुवारी अचानक रुग्णसंख्या वाढून १३२६ झाली आहे.
गेलेे दोन महिन्यांपासून अहमदनगर जिल्हा कोरोनामुळे रेड झोनमध्ये आहे. आता मात्र बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे. गुरुवारी जिल्ह्यात १३०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूूण संख्या २ लाख ५१ हजार ८०१ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.३३ टक्के इतके झाले आहे. तर बुधवारी जिल्हयात ८५८ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. पण दुसरीकडे म़ृत्यूचे प्रमाण मात्र अजूनही चिंताजनक आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३३४० हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.