मुद्देमालासह दुचाकीचोर जेरबंद, अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर (MBP LIVE 24) :

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने वडगाव गुप्ता येथून एका दुचाकी चोरास ताब्यात घेतले असून आरोपीकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.  पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ता. १७ जून रोजी फिर्यादी वंदना सुरेश झिणे (वय ४७ वर्ष रा. पिंपळगाव माळवी, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की त्यांचे पती सुरेश झिणे हे ता. २३ मे रोजीचे रात्री त्यांची हिरो एचएफ डिलक्स मोटार सायकल ( एमएच-१६ सीएच-८२३६) वरुन जेऊर येथुन कामावरुन परत घरी येत असतांना वडगाव गुप्ता ते पिंपळगाव माळवी रस्त्यावर दुचाकी बंद पडली. रस्त्याच्या बाजूला दुचाकी लावून पेट्रोल आणण्यासाठी गेले असतांना अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांची २०,००० रुपये किमतीची मोटार सायकल चोरुन नेली होती. या बाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकातील अधिकारी व अमलदार यांचे मदतीने सुरू होता. यावेळी कटके यांना गुप्त खबऱ्याकडून सदरची दुचाकी दत्तात्रय कासार (रा. वडगाव गुप्ता) याने चोरली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकातील पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक मन्सुर सय्यद, मनोज गोसावी, पोलिस नायक सुरेश माळी, विशाल दळवी, दिपक शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल रोहित येमुल, शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, चंद्रकांत कुसळकर यांनी आरोपी दत्तात्रय गणपत कासार (वय ४० वर्ष, रा. वडगाव गुप्ता, उघडमळा, ता.जि. अ.नगर) यास ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून हीरो एचएफ डिलक्स दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

याशिवाय बेलापुर (ता. श्रीरामपुर जि.अ.नगर) येथून चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली आहे. सदर दुचाकी चोरी बाबत श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांची सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही कारवाई केली.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !