नाशिक (MBP LIVE 24) :
शिंदे गावच्या मंडळ अधिका-याला (सर्कल) लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने नाशिकरोड येथे गुरुवारी (ता. 24) अटक केली. रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हा 41 वर्षाचा असून तो नाशिकला राहतो. अटक झालेल्या अधिका-याचे नाव प्रशांत भास्कर घोडके (वय ४५) आहे. शेत जमिनीच्या झालेल्या इ.टी.एस. मोजणीची साक्षांकित प्रत देण्यासाठी व तक्रारदाराला त्यांच्या कामात मदत करण्यासाठी घोडके यांनी तक्रारदाराकडे 23 जूनला दहा हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
उपनगर पोलिस ठाण्याच्या अंकीत बिटको पोलिस चौकीसमोर लाच स्वीकारण्याची ही घटना घडली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, अ पर अधीक्षक निलेश सोनवणे, उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलिस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, पोलिस प्रकाश डोंगरे, प्रणय इंगळे, एकनाथ बाविस्कर, प्रफुल माळी आदींनी ही कामगिरी केली.