नाशिक (MBP LIVE 24) :
डॉक्टर,आर्किटेक्ट आणि सीए यांचा लायन्स क्लब ऑफ नाशिक तर्फे लायन्स हॉल येथे सत्कार करून ते देत असलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.डॉक्टर डे, आर्किटेक्ट आणि सीए ड़े निमित्त डॉक्टर , आर्किटेक्ट आणि सी अे , यांचा मोमेंटो व फुलाच्या बुके ऐवजी नॅपकिन चे इकोफ्रेंडली बुके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच ते देत असलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
नवीन कार्यकरिणी अध्यक्ष नानासाहेब चव्हाण , सेक्रेटेरी सुजाता कासलीवाल, ट्रेज़रर मेधाविनी सोनवणे यांचा हा पहिलाच कार्यक्रम. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्रांतपाल एमजेएफ विनोद कपूर होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन ऊषा तिवारी यांनी केले. कार्यक्रमात डॉ. अजय कुलकर्णी, डॉ. प्रदीप गोंधळे, डॉ. विलास पाटील, डॉ. संध्या पाटील, डॉ. शैलजा गोंधळे, डॉ. गिरीश चाकोरिकर, डॉ. मकरंद धर्माधिकारी, डॉ,सोनाली गायकवाड, डॉ. विद्या उगले, डॉ. नेहा गोंधळे, डॉ. महेश पाटील, डॉ. अजिंक्य रत्नपारखी, डॉ. हर्षल गोंधळे, डॉ. निलिमा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आर्किटेक्ट सुरेश गुप्ता, सीए चंद्रकांत गुजराथी यांचा देखील सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी सभासद अभय चोकसी , सुभाष बड्गुजर, प्रकाश पठाडे, भाऊ सोनवणे, बाबूभाई खेतसी पटेल, दीपक रत्न पारखी, जयश्री चव्हाण, रत्ना पठाडे, रमीला पटेल आदी हजर होते.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.