'शिवदुर्ग'च्या रणरागिणींची पंढरपुरात 'आगळीवेगळी' ऐतिहासिक कामगिरी

अहमदनगर (श्रीगोंदा) - महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ले संवर्धन आणि दुर्ग-भ्रमण करणारी राज्यातील अग्रगण्य संस्था शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन आयोजित 'शिवदुर्ग रणरागिनींची, शिवदुर्ग सायकलवारी पंढरपुरी' हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे पार पडला. 

मंगळवारी दि. २७ जुलै २०२१ रोजी सकाळी सुरू झालेली सायकलवारी सलग दोन दिवस तब्बल २०० कि.मी अंतराचा प्रवास करून बुधवारी सायंकाळी पंढरपुरमध्ये दाखल झाली. 

"संत नामदेव पायरी" मंदीर परिसरामध्ये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीच्या वतीने हा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या सहा शिवदुर्ग महिला रणरागिणींना सन्मानीत करण्यात आले. 

दुपारी परतल्यानंतर या ६ रणरागिणींनी श्रीगोंद्याचे ग्रामदैवत असलेल्या संत शेख महंमद महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन आणि इतर मान्यवर मंडळींनी त्यांचे जोरदार स्वागत करून सन्मानित केले.

शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या संचालिका संगिता राजेश इंगळे, तालुका संपर्क प्रमुख विजया लंके, सदस्या प्रतिभा गांधी, सविता यादव, रोहिणी जगताप, रूपाली लोंढे  यांनी हा पराक्रम करून शिवदुर्गच्या वाटचालीत मानाचा तुरा खोवला आहे. 

शिवदुर्गच्या संचालिका संगिता राजेश इंगळे आणि विजया लंके या दोघींनी प्रथमच श्रीगोंदा ते पंढरपुर या सायकलवारीचे यशस्वी आयोजन करून पर्यावरण संतुलन आणि करोनामुक्त भारतासाठी पांडुरंगाला साकडे घालून श्रीगोंदेकरांचा गौरव वाढवला आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !