शेवगाव : तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, संभाजी ब्रिगेड पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांनी आज (ता. २) मराठी माणसाच्या अस्मितेचा मानबिंदू असणारे शिवसेना भवन, मुंबई येथे शिवसेनेचे थिंकटँक असणारे शिवसेना समन्वयक तथा शिवसेना उपनेते विश्वनाथजी नेरुरकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशामुळे शेवगाव काँग्रेस मध्ये असलेली अंतर्गत घुसमट समोर आली आहे
प्रा. शिवाजीराव काटे (सचिव जिल्हा काँग्रेस अहमदनगर), पांडुरंग नाबदे (तालुका उपाध्यक्ष), श्रीमती कल्पना खंडागळे (महिला तालुकाध्यक्ष) या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या वेळी अहमदनगर शिवसेना जिल्हा प्रमुख (दक्षिण ) राजेंद्रजी दळवी, शिवसेना शहरप्रमुख शेवगाव सिद्धार्थ काटे, तालुका युवा सेना प्रमुख शीतल पुरनाळे उपस्थितीत होते.
संभाजी ब्रिगेडचे कार्य करणारे ऍड. अतुल लबडे, वाडगाव ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव लबडे हे देखील आज शिवसेनेत डेरेदाखल झाले.
प्रवेशावेळी शिवसेना पदाधिकारी कल्याण लवांडे, भगवान कोकणे, गणेश ढाकणे , कुमार पाठे हे देखील उपस्थित होते.
शिवसेनेची सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी राबवली जाणारी यंत्रणा व महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची कार्यपद्धती योग्य असल्याने सर्व पदाधिकारी जिल्हाप्रमुख राजेंद्रजी दळवी यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश घेत असल्याचे प्रा. शिवाजीराव काटे यांनी सांगितले. तसेच शेवगाव तालुक्यातील जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी तिसरा सक्षम पर्याय म्हणून शिवसेना उभी राहील, असे प्रा. काटे यांनी सांगितले.