पुण्यात सोमवारपासून कॉलेज सुरू, पण 'या' विद्यार्थ्यांनाच प्रवेश

पुणे - जिल्ह्यातील कोरोना संसर्ग पुर्णपणे नियंत्रणात आला आहे. त्यामुळे याबाबत लागू केलेले निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना केली. परंतु, ठराविक विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी काही अटी असणार आहेत.

शिक्षण क्षेत्र पुन्हा सुरू करण्याबाबत राज्यातील विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीला सरकारने योग्य प्रतिसाद दिला आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. पुण्यात राज्य आणि देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांपाठोपाठ आता सर्व वरिष्ठ महाविद्यालययेही येत्या सोमवारपासून सुरू होणार आहेत. 

दि. ११ ऑक्टोबरपासून पुण्यातील वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देत असल्याचे पवार म्हणाले. पुणे शहर, पिंपरी चिंचवड, ग्रामीण भागातील कॉलेजचा यात समावेश आहे. पुण्याच्या बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

तसा लेखी आदेश दिला असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील ट्विट करत ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. महाविद्यालयात प्रवेश करताना विद्यार्थ्यांना लसीकरणाचे दोन्ही डोस पुर्ण केलेले असणे आवश्यक आहे. या अटीवरच त्यांना कॉलेजात प्रवेश मिळेल.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !