नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या 'चंद्रघंटा' या रुपाची आराधना केली जाते. या रुपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात. चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते.
चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते.देवीच्या या रूपाच्या नामोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते. जेंव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेंव्हा आपले मन, आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते.
चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतिक आहे. चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते. भूतलावर धर्माचे रक्षण आणि अंधःकार दूर करण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली, असे सांगितले जाते. या देवीची उपासना, आराधना केल्यास आध्यात्मिक आणि आत्मिक शक्ती प्राप्त होऊ शकते.
यासह तिसऱ्या दिवशी केलेल्या दुर्गा सप्तशती पठणामुळे उपासकांना यश, प्रगती, कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला 'चंद्रघंटा' असे संबोधले जाते.
दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरुप कल्याणकारी आहे. चंद्रघंटा देवी दशभुजा आहे. देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ आहे. देवीच्या या रूपाच्या नामोच्चार मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते. चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतिक आहे.
चंद्रघंटा देवीचे वाहन सिंह आहे. त्यांच्याकडे दहा हात आहेत. देवीच्या हातात कमळाचे फूल, धनुष्य आणि जपमाळ आणि बाण आहेत. उर्वरित हातांमध्ये त्रिशूल, गदा, कमंडल आणि तलवार आहे. आईचा पाचवा हात अभय मुद्रामध्ये राहतो.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. यानंतर व्रताचा संकल्प करून पूजन करावे. चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पिवळ्या किंवा सोनेरी रंगाची वस्त्रे परिधान केल्यास उत्तम.
तसेच चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये खीर, बर्फीचा आवर्जुन वापर करावा, असे सांगितले जात आहे. याशिवाय देवीला मध अर्पण करावा, असे म्हटले जाते.