शेवगाव (अहिल्यानगर) – "शिक्षकांचे संस्कार व शाळेचे शिक्षणच आमच्या यशामागचे खरे कारण आहे", अशी भावनिक भावना व्यक्त करत आबासाहेब काकडे विद्यालयातील १९९५ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणात स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमात माजी प्राचार्य जयराम सुडके, चंद्रकांत पाचुंदकर, चंद्रकांत आहेर, बापूसाहेब डमरे, गणपत शेलार, मंदाकिनी खंडागळे, मंदाकिनी भालसिंग आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते होते.
प्राचार्य दसपुते यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मोठी प्रगती केल्याचे पाहून शिक्षक म्हणून समाधान मिळते. आज आमचाच एक विद्यार्थी संजय कोळगे राजकारणात राज्यस्तरावर कार्यरत आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.
या स्नेहमेळाव्याचे आयोजन यशस्वी करण्यासाठी सुरेश उभेदळ, संजय कोळगे, कृष्णा पायघन, दाद काळे, जब्बार पटेल, युसुफ पटेल, कैलास गहाळ, गणेश अनपट, राजू खडके यांनी परिश्रम घेतले.
यावेळी अंजली आहेर, विजय राजगुरु, अनिता मोहीते, प्रतिभा मगर, निता पारखे, वंदना लव्हाट, बेबी म्हस्के, मंगल डांगे, शितल पुरनाळे, महेश पुरनाळे, दत्ता खेडकर, पोपट भोरजे, आदींनी मेहनत घेतली.
यावेळी ६४ माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. अंजली आहेर यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन दिपक कुसळकर यांनी तर आभार महेश पुरनाळे यांनी मानले.
याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांवर पुष्पवृष्टी करून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी २५ हजारांची रक्कम विद्यालयास भेट दिली.
३० वर्षानंतर भेटलेल्या मित्रामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. प्रत्येकाचे सुखदुख या निमित्ताने शेअर करता आले. त्यावेळी शिक्षकांनी केलेले संस्कार आमच्या कामी आल्याचे संजय कोळगे यांनी सांगितले.
३० वर्षांनंतर जुन्या मित्रांच्या भेटी, शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि परस्पर संवाद यामुळे उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसून आले. हा मेळावा विद्यार्थ्यांच्या मनात एक अविस्मरणीय आठवण ठरला.