येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर – मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. ‘ब्लॉसमिंग ऑलमंड’ या मराठी चित्रपटाची निवड दक्षिण कोरियात होणाऱ्या ११ व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी अधिकृतपणे करण्यात आली आहे.
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नेहाल एस. घोडके यांनी केले आहे. कथा, पटकथा आणि संवादही त्यांनीच लिहिले आहेत. अनंत काळे यांनी स्क्रिप्ट सल्लागार म्हणून काम पाहिले आहे.
या चित्रपटात मनीषा मोरे, पुरुषोत्तम उपाध्याय, निवृत्ती. के. गर्जे, जानवी लटके, अंजली कोंडावार, रावसाहेब अलकुटे आणि प्रणित मेढे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
सिनेमॅटोग्राफीचे काम सचिन गायगोवे यांनी पार पाडले, तर संकलनाची जबाबदारी अमोल सुरुंकर यांनी सांभाळली आहे.
सहयोगी दिग्दर्शक म्हणून अमोल सुरुंकर, तर सहाय्यक म्हणून मयूर आहेर, कराळे शुभम आणि रिझवान सय्यद यांनी योगदान दिले आहे. तसेच शुभम जगदाळे, आदींचेही सहकार्य मिळाले.
प्रकाशयोजनेची जबाबदारी सचिन गायगोवे, दिनेश सुतार आणि रिझवान सय्यद यांनी सांभाळली आहे. तर पोशाख आणि मेकअप विभागात श्रेया गायकवाड, अपूर्वा काकडे आणि सोनिया लोटके यांचा सहभाग आहे.
ध्वनी विभागात शुभम कराळे आणि दिनेश सुतार यांनी काम पाहिले असून, कास्टिंग टीममध्ये निवृत्ती गर्जे आणि पुरुषोत्तम उपाध्याय यांचा समावेश आहे. कार्यकारी निर्माते म्हणून अमोल के. सुरुंकर आणि नेहाल एस. घोडके कार्यरत आहेत.
अत्यंत कमी खर्चात आणि मोजक्याच तांत्रिक संसाधनांचा वापर करून हा चित्रपट तयार केला गेला असून हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याने संपूर्ण टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा टप्पा त्यांच्या चित्रपट प्रवासातील महत्त्वाचा मैलाचा दगड ठरत आहे.
मानवी नात्यांमधील भावभावनांचे पदर उलगडणाऱ्या या सिनेमाला परदेशात कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.