नगर-औरंगाबाद महामार्गाजवळ आढळला 'त्या' युवकाचा मृतदेह

अहमदनगर - सोशल मिडियाच्या माध्यमातून नातेवाईकांना आपण आत्महत्या Suicide) करत असल्याचे संदेश व व्हिडिओ क्लिप एका युवकाने पाठवले. यानंतर बेपत्ता झालेल्या त्या युवकाचा मृतदेह नगर ते औरंगाबाद महामार्गाजवळ एका झाडाला गळफास (Hanged) घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. 

हा प्रकार शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या आसपास डोंगरगण (Dongargan) फाटा ते जेऊर टोलनाका (Jeur Tol Plaza) दरम्यान एका शेतामध्ये घडला. या युवकाने एका व्हिडिओ क्लिपद्वारे आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन केले होते. यानंतर त्याची बहिण आणि इतर नातेवाईकांनी त्याने नमूद केलेल्या दिशेने धाव घेतली. 

गळफास घेतलेल्या अवस्थेतील युवक एका राजकीय नेत्याचा स्वीय सहायक (Political Leadres Personal Assistant) असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. प्रतिक काळे (ता. नेवासा) नावाचे ओळखपत्र त्याच्या खिशात सापडले. प्रतिकने नातेवाईकांना मेसेज पाठवून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. 

ही माहिती तत्काळ पोलिसांना कळवण्यात आली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आठरे, त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळाने नगर ग्रामीण उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक (DYSP) अजित पाटील हेही घटनास्थळी आले. 

प्रतिकचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह हलवण्यास नकार दिला. परंतु, पोलिसांनी आवाहन केल्यानंतर प्रतिकचा मृतदेह रुग्णवाहिकेतून (Ambulance) जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला. शनिवारी सकाळी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

घटनास्थळी सापडलेली प्रतिकची मोटारसायकल (Bike), मोबाईल (Mobile)I, पाकिट, आदी साहित्य पोलिसांनी पंचनामा करून जप्त केले आहे. प्रतिकने सोशल मिडियावर पाठवलेल्या मेसेजमध्ये एका राजकीय कुटुंबातील व्यक्तींची व त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींची नावे लिहिलेली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !