नाहीतर तुम्ही 'माणूस' असण्याचा काय उपयोग.?


आपण जर सामाजिक कार्यकर्ते असू तर यासारखा आनंद काही वेगळाच असतो. समाजासाठी काही करावं, त्यांचं भलं पहावं. त्यांच्या आनंदासाठी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रयत्न करावा अस वाटणं हेचं आपल्यातील वेगळेपण असतं.


भले तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील असाल.. खरंतर परमेश्वराचे आपण आभार मानायला हवेत. त्याने असे विचार आपल्या स्वभावात भरभरून दिले असतात. हीच आपल्यासाठी जमेची बाब असते.

नाहीतर आयुष्यभर पैसा कमावला, नंतर प्रश्न पडतो.. आपण नेमकं केलं काय आयुष्यात.? जगण्याचा अर्थच जर उमगला नसेल तर उपयोग काय.. परमेश्वराने आपल्याला माणूस म्हणून दिलेल्या वरदानाचा.?

माणूस मुळातच सहवास प्रिय आहे. सोबत असल्याशिवाय आपण जगूच शकत नाही. एखाद्या सुंदर बेटावर आपल्याला एकटे आणून सोडले तर आपण राहूच शकणार नाही. आपल्याला सोबत हवी असते, संवाद हवा असतो.

गप्पा रंगल्या पाहिजेत.. संवेदना हव्यात. डोळ्यात टचकन पाणी यायला हवं. खळखळून हसता आलं पाहिजे. मनस्वीपण यातच दडलेलं असतं.

नाहीतर तुम्ही मोठे पुढारी असाल, उद्योगपती असाल.. चांगले लेखक आहात, खेळाडू आहात.. पण तुमच्यात इतरांविषयी संवेदनाच नसतील तर तुमच्या माणूस असण्याचा काय उपयोग.? इतरांसाठी थोडं जरी काही करू शकलो तर त्यासारखा कोणता आनंद नसतो.. हे लक्षात यायला हवं..

सुख समजायला हवं..
अर्थ कळायला हवा..

- जयंत येलुलकर
(अध्यक्ष, रसिक ग्रूप, अहिल्यानगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !