घोडेगाववर शोककळा ! पाणी पुरवठा तलावात बुडून ३ तरुणांचा दुर्दैवी अंत


नेवासा (अहिल्यानगर) - तालुक्यातील घोडेगाव (Ghodegaon) येथे मंगळवारी दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी तीन तरुण बुडाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रात्री साडेअकरा वाजता तिसऱ्या तरुणाचा मृतदेह पाण्यातून काढण्यात आला.


सोनई (Sonai) रोडवर असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम सध्या रखडलेले आहे. याच ठिकाणी साचलेल्या पाण्यात दुपारी ४ वाजेच्या सुमारास घोडेगाव येथील चार मित्र पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना प्रथमेश सुभाष काळे हा तरुण अचानक पाण्यात बुडू लागला.

त्याला वाचवण्यासाठी (Help) त्याच्या इतर मित्रांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तेही संकटात सापडले. या भीषण प्रसंगाने घाबरलेल्या एका मित्राने तातडीने गाव गाठले आणि घरच्यांना व ग्रामस्थांना माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली.

घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे (API Anil More) यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. शोधमोहीम (Search Operation) सुरू झाल्यानंतर काही वेळातच प्रथमेश सुभाष काळे (Prathamesh Kale) याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

शोधकार्य सुरू असतानाच रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास जीवन रवींद्र आव्हाड (Jiwan Aavhad) या तरुणाचा मृतदेह पथकाच्या हाती लागला. तर शोएब अयुब शेख या तिसऱ्या तरुणाचा शोध घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत अंधारातही शोधमोहीम राबवली जात होती.

रखडलेले काम आणि सुरक्षेचा प्रश्न - सोनई रोडलगत असलेल्या या योजनेचे काम रखडलेले असल्याने तिथे सुरक्षेचा (Lack of Security) अभाव होता, असे बोलले जात आहे. ऐन तरुण वयातील मुलांचा असा करुण अंत झाल्याने घोडेगाव गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पाणी पुरवठ्याच्या तलावात मुले बुडाल्याची माहिती मिळताच प्रशासन आणि ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले. दोन मृतदेह मिळाले असून, तिसऱ्या मुलाचा शोध सुरू केला, असे सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांनी सांगितले.

ताजे अपडेट्स : दरम्यान, रात्री साडे अकरा वाजता सात तास उलटल्यानंतर तिसऱ्या युवकाचा मृतदेह सापडला. शोधकार्यासाठी विशेष बोट आणि पथक पाण्यात उतरले होते. रात्री साडेअकरा वाजल्यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली.

येथे क्लिक करुन इंस्टाग्रामवर फॉलो करा

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !