भक्ती, शक्ती आणि कलेचा त्रिवेणी संगम ! 'श्री घोडेश्वरी यात्रा महोत्सवा'चा दिमाखदार सोहळा


घोडेगाव (अहिल्यानगर) - महाराष्ट्र राज्यातील वैभवशाली परंपरांपैकी एक असलेला 'श्री घोडेश्वरी यात्रा महोत्सव' यंदा नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मंगळवार दि. ७ एप्रिल २०२६ पासून या मुख्य यात्रोत्सवाला सुरुवात होत आहे.

यानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या निमित्ताने 'त्रैदिनी कीर्तन महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची सुश्राव्य कीर्तने रंगणार आहेत.

  • शनिवार दि. ४ एप्रिल : संगीत अलंकार रत्न ह.भ.प. कविराज महाराज झावरे (पारनेरकर) यांचे जाहीर हरी कीर्तन होईल.
  • रविवार दि. ५ एप्रिल : विनोदाचार्य खान्देशरत्न ह.भ.प. प्रल्हाद महाराज कळमसरे (पाचोरा) यांचे कीर्तन होईल.
  • सोमवार दि. ६ एप्रिल : ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या जाहीर कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल. (सर्व कीर्तने रात्री ९ वाजता होणार आहेत.)

मुख्य यात्रेच्या दिवशी, ७ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता कावडी मिरवणूक व गंगास्नान होईल. सकाळी ९:३० वाजता श्री घोडेश्वरी देवीला चोळी-पातळ अर्पण करून महाआरती व प्रसाद वाटप करण्यात येईल. रात्री ७:३० वाजता पालखीची भव्य मिरवणूक (छबिना) काढली जाईल. रात्री १० वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात येईल.

लोककलेचा आनंद देण्यासाठी ७ एप्रिल रोजी खान्देश रत्न आनंद महाजन (जळगावकर) यांचा मोफत लोकनाट्य तमाशा आयोजित केला आहे. तसेच ८ आणि ९ एप्रिल रोजी पद्मश्री पुरस्कार विजेते मास्टर रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा भाविकांसाठी विनामूल्य सादर केला जाईल.

कुस्त्यांचा भव्य जंगी हगामा : बुधवार दि. ८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता 'श्री घोडेश्वरी केसरी कुस्ती' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नामवंत पैलवानांच्या निकाली कुस्त्या होतील. मुख्य लढतींमध्ये..

  • पैलवान अब्बू चाऊस विरुद्ध पैलवान सागर कोल्हे (बक्षीस रु. ७१,०००/-)
  • पैलवान लौकिक चौगुले विरुद्ध पैलवान महेश फुलमाळी (बक्षीस रु. ६१,०००/-)
  • पैलवान अमोल शिंदे विरुद्ध पैलवान विनोद साळकर (बक्षीस रु. ५१,०००/-)
  • यांसह शेकडो पैलवानांच्या कुस्त्या पार पडणार आहेत.

इतर आकर्षणे : गुरुवार दि. ९ एप्रिल : सकाळी ८ ते ९ या वेळेत देणगीदारांचा सन्मान सोहळा. रात्री ९ ते १२ या वेळेत घोडेश्वरी नाट्य कला अकॅडमी, घोडेगाव प्रस्तुत 'माहेरची पाहुणी' हे विनोदी नाटक सादर होईल. गुरुवार दि. २३ एप्रिल : सय्यद बाबांचा संदल निघणार आहे.

समस्त ग्रामस्थ आणि श्री घोडेश्वरी देवस्थान यात्रा कमिटी, घोडेगाव यांनी सर्व भाविक भक्तांना, ग्रामस्थांना आणि कलाप्रेमींना या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !