श्री घोडेश्वरी देवी यात्रेत दिग्गज पैलवानांची लढत, भव्य 'कुस्त्यांचा हगामा'

​नेवासा (अहिल्यानगर) - येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दिनांक ८ एप्रिल  रोजी दुपारी ४ वाजता देवी मंदिर परिसरात हे मैदान रंगणार आहे. यात महाराष्ट्र केसरी स्तरावरील नामवंत पैलवान आपले कसब पणाला लावणार आहेत.

​कुस्ती हगाम्यानिमित्त दिग्गज मल्लांमध्ये 'काटे की टक्कर' होणार आहेत. ​​मैदानात अनेक लक्षवेधी लढती होणार आहेत. महिला कुस्तीगीरांचेही मैदान गाजणार आहे. ​मैदानाचे मुख्य आकर्षण चांदीची गदा आणि लाखांची बक्षिसे आहेत.

​या कुस्ती महोत्सवाचे मुख्य आकर्षण प्रथम क्रमांकाची कुस्ती असून, विजेत्या पैलवानाला ७१,००० रुपये आणि चांदीची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे. ही मानाची गदा कै. पै. भाऊराव नामदेव चौधरी यांच्या स्मरणार्थ चौधरी परिवार व घोडेश्वरी देवी यात्रा कमिटी यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

खास लढतींमध्ये खालील मल्लांचा समावेश आहे -

  • ​अब्बू चाऊस (परभणी) विरुद्ध सागर कोल्हे (कोल्हापूर)
  • ​लौकिक चौगुले (वाडिया पार्क) विरुद्ध महेश फुलमाळी (आत्मा मालिक)
  • ​अमोल दिडे (आष्टी) विरुद्ध विनोद सालकर (अकोले)
  • ​अतुल नायकल विरुद्ध सौरभ मराठे

​या व्यतिरिक्त विनोद डमाळे, संतोष काळे, ऋत्विक बिन्नर, अरबाज शेख यांसारख्या अनेक नामांकित मल्लांच्या कुस्त्या विविध इनामांसाठी लावण्यात आल्या आहेत. 

​स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत यंदा खास महिला कुस्ती स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. यात धनश्री फंड विरुद्ध आर्या शिंदे, गौरी मुखेकर विरुद्ध वैष्णवी पवार आणि स्वरा मोडक विरुद्ध दुर्गा शिरसाठ अशा चुरशीच्या लढती पाहायला मिळतील. महिला कुस्तीसाठी २५,००० रुपयांपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

​नियम आणि शिस्त : ​कुस्ती समितीने खेळाच्या पारदर्शकतेसाठी कडक नियम जाहीर केले आहेत. प्रत्येक कुस्तीसाठी जास्तीत जास्त २० मिनिटांचा वेळ दिला जाईल आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील. या मैदानाचे संचालन 'निस' कुस्ती कोच पै. विवेक नायकल व पै. संभाजी निकाळजे करणार असून, कुस्ती निवेदक म्हणून प्रा. पै. युवराज सोलनकर (कर्जत) आपली सेवा देतील.

कुस्ती शौकिनांनी या ऐतिहासिक आणि थरारक मैदानाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री घोडेश्वरी यात्रा महोत्सव कमिटी, घोडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

येथे क्लिक करुन इंस्टाग्रामवर फॉलो करा

ही बातमीही वाचा : 'श्री घोडेश्वरी यात्रा महोत्सवा'चा दिमाखदार सोहळा

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !