अहिल्यानगर – विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र राज्याच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा संस्थापक अध्यक्ष प्रा. नागोराव पांचाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत करण्यात आली.
राज्यभर संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी आणि बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्यातील तीन सक्रिय शिलेदारांची राज्य कार्यकारिणीवर वर्णी लागल्याने जिल्ह्याच्या कार्याला राज्यस्तरावर मोठी दाद मिळाली आहे.
या निवडीमध्ये राजकुमार राऊत (Rajkumar Raut) यांची 'राज्य संघटक' पदी, भाऊसाहेब राऊत (Bhausaheb Raut) यांची 'राज्य प्रवक्ता'पदी, तर भगवान राऊत (Bhagwan Raut) यांची 'राज्य प्रसिद्धी प्रमुख' या महत्त्वपूर्ण पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.
अहिल्यानगर पॅटर्नची राज्यभर चर्चा : जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत संघटनेने अत्यंत प्रभावी काम केले आहे. सर्व १४ तालुक्यांमध्ये संघटनेच्या शाखा स्थापन करून विक्रमी संघटन उभे करण्यात आले आहे. अशी कामगिरी करणारा अहिल्यानगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. (Ahilyanagar Pattern) याच कामाची पावती म्हणून जिल्ह्याला राज्य कार्यकारिणीत तीन महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत.
जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन : या निवडीबद्दल जिल्हा अध्यक्ष प्रसाद गडकर (Prassd Gadkar), जिल्हा कार्याध्यक्ष आदिनाथ भालेकर (Adinath Bhalekar), जिल्हा सचिव अशोक गोरे (Ashok Gore) यांच्यासह सर्व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
"या नियुक्त्यांमुळे जिल्ह्याच्या संघटन कार्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असून, आगामी काळात समाज एकजुटीची चळवळ (Unity) अधिक वेगवान होईल," असा विश्वास प्रा. प्रसाद गडकर यांनी यावेळी व्यक्त केला.
या नियुक्त्यांमुळे विश्वकर्मा समाजात आनंदाचे वातावरण असून, नूतन पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्यस्तरावरील या संधीमुळे भविष्यात संघटनेचा विस्तार अधिक प्रभावीपणे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
