येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
कोल्हापूर (Kolhapur News) - अहिल्यानगरमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक जालिंदर बोरुडे (Jalindar Borude) यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा 'महात्मा फुले राष्ट्रीय सन्मान पुरस्कार-2026' (Mahatma Phule National Award) जाहीर झाला आहे.
कोल्हापूर येथील सत्यशोधक प्रागतिक मंच आणि निर्मिती विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष आदित्य म्हमाने आणि सचिव अंतिमा कोल्हापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पुरस्कार सोहळा खालीलप्रमाणे संपन्न होईल:
- तारीख : शनिवार, 11 एप्रिल 2026
- वेळ : सकाळी 10:30 वाजता
- स्थळ : राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर
३४ वर्षांची अविरत समाजसेवा : जालिंदर बोरुडे हे गेल्या 34 वर्षांपासून 'नेत्रदूत' म्हणून ओळखले जातात. फिनिक्स सोशल फाउंडेशनच्या (Phoenix Social Foundation) माध्यमातून त्यांनी स्वखर्चाने हजारो गोरगरीब रुग्णांना दृष्टी (Free Cataract Surgery) मिळवून दिली आहे. (Ahilyanagar Social Worker)
नागरिकांना मरणोत्तर नेत्रदानासाठी प्रोत्साहित करून त्यांनी अनेकांचे नेत्रदान यशस्वीरित्या घडवून आणले आहे. केवळ नेत्रच नव्हे, तर अवयवदानाच्या क्षेत्रातही त्यांचे मोठे प्रबोधन कार्य (Eye Donation Awareness) सुरू आहे. समाजातील उपेक्षित घटकांसाठी फाउंडेशनच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबवले जातात.
बोरुडे यांच्या या निस्वार्थी कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेल्याने अहिल्यानगरसह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा जपत, सामान्यांच्या आयुष्यात प्रकाशाची किरणे पसरवणाऱ्या बोरुडे यांच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

