घोडेगाव तलाव दुर्घटना ! अखेर 'या' दोघांवर गुन्हा दाखल; निष्काळजीपणाचा ठपका


नेवासा (अहिल्यानगर) - नेवासा तालुक्यातील घोडेगाव (Ghodegaon) येथे 'जलजीवन मिशन' अंतर्गत सुरू असलेल्या तलावाच्या कामात सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला होता.

(हे YouTube चॅनल Subscribe करा)

याप्रकरणी अखेर संबंधित ठेकेदारांवर सोनई पोलीस ठाण्यात (Sonai Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचा ठपका फिर्यादीत ठेवण्यात आला आहे.

दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी दुपारी ४:३७ वाजेच्या सुमारास घोडेगाव येथील जलजीवन मिशनच्या तलावात प्रथमेश सुभाष काळे (वय १७), जीवन रविंद्र आव्हाड (वय १७) आणि शोएब अय्युब शेख (वय १७) या तिघा मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल : या प्रकरणी सुभाष वैजनाथ काळे (रा. न्हावी गल्ली, घोडेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून -
  • योगेश काशीनाथ हिंगणे(रा. बारामती, जि. पुणे)
  • के. के. थोरात (रा. संगमनेर)
या दोन ठेकेदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०५, ३(५) अन्वये गुन्हा (रजि. नं. १२२/२०२६) दाखल करण्यात आला आहे.

ठेकेदारांचा निष्काळजीपणा उघड : फिर्यादीत म्हटल्यानुसार, या तलावाचे काम वेळेत पूर्ण झाले नव्हते. अत्यंत धोकादायक स्थितीत असलेल्या या तलाव परिसरात खालील त्रुटी आढळल्या:
  • कोणतीही संरक्षण भिंत किंवा कुंपण (Wall Compound) घातलेले नव्हते.
  • नागरिकांसाठी धोक्याचे सूचना फलक (Board) लावले नव्हते.
  • तलावात कालव्याचे पाणी झिरपत असूनही सुरक्षारक्षक (Security) नेमला नव्हता.
  • वर्दळीच्या रस्त्यालगत हा तलाव असल्याने येथे मोठी जोखीम होती, तरीही ठेकेदारांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष (Ignorence) केले.

तपास सुरू : मुलांच्या मृत्यूनंतर अंत्यविधी आटोपल्यानंतर फिर्यादी पोलीस ठाण्यात हजर झाल्याने गुन्हा दाखल होण्यास काहीसा विलंब झाला. सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !