येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - जिल्ह्यामध्ये केबल आणि तांबे चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. जेऊर (ता. जि. अहिल्यानगर) येथील सोलर कंपनीतून केबल (Solar Copper Cable) चोरणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ९,९१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जेऊर येथील 'अवाडा' (Awada Company) कंपनीतून १८ मार्च २०२६ रोजी अज्ञात चोरट्यांनी ६५०० मीटर सोलर केबल चोरली होती. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल झाला होता. या कारवाईमुळे गंगापूर (Ganngapur) आणि येवला (Yeola) येथील प्रत्येकी एक असे दोन अन्य चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक केलेले आरोपी :
- संतोष अशोक जाधव (वय २८, रा. प्रवरासंगम, नेवासा)
- करण वैश्य भोसले (वय २०, रा. भेंडाळा, गंगापूर)
- मनोज सुनील लिंभोरे (वय २३, रा. प्रवरासंगम, नेवासा)
- परमेश्वर वैश्य भोसले (वय ३९, रा. भेंडाळा, गंगापूर)
आरोपींचा गुन्हेगारी इतिहास : तपासात असे समोर आले की, आरोपी संतोष जाधव आणि परमेश्वर भोसले हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यांत दरोडा, घरफोडी आणि चोरीचे अनेक गंभीर गुन्हे (अनुक्रमे १० आणि ७ गुन्हे) दाखल आहेत.
पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल :
- २०० किलो तांब्याची तार (किंमत २ लाख रुपये)
- महिंद्रा पिकअप गाडी (किंमत ७ लाख रुपये)
- एक मोटार सायकल, ४ मोबाईल, कटर आणि स्क्रू ड्रायव्हर.
पोलीस अधीक्षक (DSP) सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक (LCB PI) किरणकुमार कबाडी, पोउपनि (PSI) अनंत सालगुडे, संदीप मुरकुटे आणि त्यांच्या पथकाने 'शेंडी बायपास' (Shendi Bypass Road) येथे सापळा रचून ही यशस्वी कारवाई केली. पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन करत आहे.
