आंबेडकरी विचारांची प्रभावी मांडणी; वक्तृत्व स्पर्धेत निखिल, प्रियांका, वैष्णवीचा गौरव


शेवगाव (अहिल्यानगर) - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर  (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील महात्मा सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या वरिष्ठ महाविद्यालयीन स्तर वक्तृत्व स्पर्धा (Speech Competition) दि 6 रोजी वाचनालयाच्या न्या. रानडे सभागृहात संपन्न झाल्या.

या स्पर्धेत निखिल बोडखे (प्रथम- न्यू आर्ट्स कॉलेज), प्रियांका शेळके (द्वितीय- प्रवरा कॉलेज) वैष्णवी जोशी (तृतीय-निर्मलाताई काकडे महाविद्यालय) यांनी उत्तम वैचारिक मांडणी करत पारितोषिक (Award) प्राप्त केली.

तर वैष्णवी बर्डे व समृद्धी वाघ यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली. परीक्षण प्रकाश दहिफळे व महेश लाडने यांनी केले. विजेत्यांना अध्यक्ष वाचनालयाचे प्रा. रमेश भारदे, सचिव हरीश भारदे,खजिनदार एजाज काझी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ ओंकार रसाळ यांनी केले, तर सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !