शेवगाव (अहिल्यानगर) - जिल्हा खो-खो (Kho Kho) असोशिएशनच्या मान्यतेने व श्रीयोग कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, नागापूर यांच्या संयुक्त विद्यमाने किशोर व किशोरी गटाच्या १४ वर्षा खालील निवड चाचणी खो-खो स्पर्धा सनफार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अहिल्यानगर (Sunfarma Highschool) येथे नुकत्याच संपन्न झाल्या.
या स्पर्धेत पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल (Balasaheb Bharde Highschool), शेवगावच्या मुलींचा संघ विजेता ठरला. क्रीडा शिक्षक सचिन शिरसाठ यांनी या संघाला मार्गदर्शन केले. या संघाने दिग्विजय - (भिंगार) एकलव्य - (अहिल्यानगर ), वाकडी (नेवासा) या संघांना मात देत अंतिम फेरीत गतविजेत्या रुईछतीसी संघाला पराभूत केले.
कर्णधार आराध्या राठोड, राजनंदिनी पन्हाळे, काव्या राठोड, स्वरा नाईकवाडी, ज्ञानदा भाडाईत, कल्याणी बुलबुले, आरोही ढाकणे, कार्तिकी नगरकर, श्रावणी शिरसाठ, वैष्णवी मरकड, स्वरा ढाकणे, स्वामीनी साखरे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजयश्री मिळवून दिली.
या संघातील विजेत्यांचा सत्कार हरीश भारदे व प्रा. संजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संघातील खेळाडूंना शाबासकी देत त्यांचे कौतुक केले.
