येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
टीम MBP Live24 - शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये सर्वसामान्य (Middle Class) ते उच्चभ्रू (High Profile) नागरिकांचा वावर असला तरी मूलभूत सुविधांच्या (Basic Needs) काही महत्त्वाच्या तक्रारी (Complaints) अजूनही कायम आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत अनेक विकासकामांना गती मिळाली असली तरी पाणीपुरवठ्यात पूर्ण दाब मिळत नाही.
सार्वजनिक स्वच्छता समाधानकारक नाही, तसेच काही भागात रस्त्यांची दुरवस्था आणि सार्वजनिक शौचालयांचा अभाव जाणवतो. श्रीमंतांच्या सोसायटीत झालेले सिमेंटचे रस्ते (Ciment Concret Road) गरिबांच्या वस्त्यांपर्यंत यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
अशी आहे या प्रभागाची व्याप्ती : नवीन व जुना टिळक रोड परिसर, वाडिया पार्क (Wadia Park), जुने बस स्थानक (Old Bus Stand), आरटीओ कार्यालय (RTO Office), कोंबडीवाला मळा (Kombadiwala Mala), इवळे मळा (Ivale Mala), मार्केट यार्ड (Marketyard), नवजीवन कॉलनी (Navjivan Colony), आनंदधाम (Aanand Dham), क्लेरा बुस मैदान (Clera Bruce Ground), सीएसआरडी (CSRD), नंदनवन कॉलनी (Nandanvan Colony), सुगंधी चाळ (Sugandhi Chawl).
आयुर्वेद कॉलेज ते माळीवाडा वेस, विशाल गणपती मंदिर (Vishal Ganehsh Temple), कवठीची तालीम, बंगाल चौकी, हातमपुरा, धरती चौक ते सरोष टाकी (Sarosh Talkies) आणि सोलापूर रस्त्याने (Solapur Road) शांतीनगर (Shanti Nagar) ते लोखंडी पूल अशी या प्रभागाची व्यापक हद्द आहे. वाडियापार्क, जुने बसस्थानक आणि मार्केट यार्डसारख्या महत्त्वाच्या वर्दळीच्या जागा याच प्रभागात येतात.
बहुतांश ठिकाणी सिमेंटचे रस्ते झाले असले तरी मार्केट यार्डच्या पाठीमागील करपे मळा आणि काही अंतर्गत भागात रस्त्यांची कामे रखडली आहेत. काही ठिकाणी ड्रेनेज लाइन नसल्यामुळे नागरिकांना सांडपाणी थेट ओढ्यात सोडावे लागते.
माळीवाडा बसस्थानक परिसरात दिवसा आणि रात्री चोरीच्या घटना वाढल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या प्रभागातील नागरिकांच्या समस्या :
कोठी परिसर :
- रस्ता झाला परंतु साईड पट्ट्यांची कामे अपूर्ण.
- पावसाळ्यात घरासमोर चिखल साचतो.
- घंटागाडी नियमित येत नाही; सफाईही अयोग्य.
- महापालिकेने कामे गतीने पूर्ण करावीत.
दूषित पाणीपुरवठा :
- पाणी दिवसाआड मिळते, पण बहुतांश वेळा दूषित.
- मार्केट यार्ड भागातील रस्त्यांची दुरवस्था.
- पथदिवे लावले असले तरी प्रकाश पडत नाही.
मोकळे भूखंड आणि रस्त्यांची अवस्था :
- पूनम मोती नगरातील मोकळा भूखंड बंद अवस्थेत
- सुशोभीकरणाची मागणी.
- पार्श्वनाथ व अरिहंत कॉलनीमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था.
- कोठी परिसरातील जुनी शौचालये पाडून केवळ दोन फायबर शौचालये बसवली.
- कोठी परिसरातील नागरी सुविधांचा अभाव
अपूर्ण साईड पट्टे :
- पुणे महामार्गालगत सिमेंट रस्ता तयार
- पण साईड पट्टे न झाल्याने पावसाळ्यात घरात पाणी शिरते.
- अपुरी शौचालये व ड्रेनेज
- जुन्या सार्वजनिक शौचालयाच्या जागी फक्त दोन फायबर शौचालये;
- ही सुविधा संपूर्ण परिसरासाठी अपर्याप्त.
- ड्रेनेज लाइनची नियमित सफाई होत नाही.
सार्वजनिक शौचालयांचा अभाव :
- माळीवाडा व तीन नंबर बसस्थानक वगळता इतर ठिकाणी सुविधा नाही.
बसस्थानक परिसरातील अतिक्रमण :
- वारंवार अतिक्रमण
- वाहतूक कोंडी वाढते.
- कचऱ्याचा प्रश्न कायम
- खासगी वाहनचालकही गोंधळ वाढवतात.
प्रभागात मोठे उद्यान नाही :
- नागरिकांना विहारासाठी वाडिया पार्क, किल्ला मैदान किंवा रस्ते वापरावे लागतात.
आरोग्य केंद्राची गरज :
- प्रभागात महापालिकेचे आरोग्य केंद्र कार्यान्वित नाही
- ते तातडीने सुरू करण्याची मागणी.
