'सुंदर दिसण्याचे टेन्शन' घालवतेय जगण्यातली मजा


माझ्या एका मैत्रिणीच्या आई (Mother) झोपताना सुध्दा अगदी व्यवस्थित नीटनेटक्या होऊन झोपत. यावर त्या म्हणत, "रात्री झोपेत काही अघटीत घडले तर लोकांनी म्हणायला नको, बाई कशी दिसत होती.!"


हे तुम्हाला कितीही हास्यास्पद वाटले तरी बाईला दिसण्याचे टेन्शन (Tension) असतंच. नेहमीच सुंदर दिसण्याचे खूळ ज्याच्या त्याच्या डोक्यात फीट आहे हे मात्र निश्चित. आपल्या देशात जो इंग्रजी (English) बोलतो तो हुशार, जो गोरा तो सुंदर असा अजब समज आहे

एका घरच्या लग्नात हळदीच्या वेळी घरातील सगळ्या महिलांनी मेकअप (Make up) करून घेतला. फोटोत आम्ही साऱ्याजणी पांढऱ्याफटक आणि हात काळे असे हास्यास्पद दिसत होते.

दुसऱ्या दिवशी मी काही त्या मेकअप अभियानात सहभागी झाले नाही. ती सौंदर्य तज्ञ मला म्हणाली, "जिजी, फोटो (Photo) छान यावेत म्हणून गोरं करावं लागतं, फोटोत सावळा रंग आला तर कस्टमर (Customer) कंम्प्लेंट करतात.!"

पण आपल्या खऱ्याखुऱ्या दिसण्याचे नैसर्गिक फोटो (Candid Clicks) जास्त छान येतात. आता मोबाईलवर वेगवेगळे ॲप आहेत. त्यात फोटो काढताना तुम्ही हवे ते बदल करु शकता.

याचा अर्थ मी मेकअपच्या विरोधात (Against) नाही पण सतत हेवी, बोल्ड मेकअप (Bold Make up) करु नये. त्यात तुमची देहबोली नैसर्गिक रहात नाही. मजा म्हणून कधीतरी करायला हरकत नाही, पण या गोष्टी सतत केल्याने त्यातील गंमत निघून जाते हे मात्र निश्चित.

आजही तुम्ही दिसण्याच्या दडपणाखाली असाल तेव्हा तुम्ही तुमचं खरेखुरे 'असणे' नाकारत असता. सोशल मीडिया (Social Media) आणि सुंदर दाखविण्याचा सोस आपल्याला टाळता यायला हवा, हे मात्र खरं..!

अभिनेत्री (Actress) मेकअप करतात ती त्यांच्या व्यवसायाची गरज असते. आपण खरेखुरे जगण्याची आणि दिसण्याची मजा घ्यावी असे मला वाटते.! तुम्हाला काय वाटते?

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !