येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
टीम MBP Live24 - शहराचे प्रवेशद्वार मानला जाणारा माळीवाडा (Maliwada) परिसर आजही मूलभूत सुविधांच्या (Basic Needs) समस्यांनी ग्रासलेला असून नागरिक त्रस्त आहेत. अरुंद रस्त्यांवरील व्यावसायिकांचे अतिक्रमण, उखडलेले रस्ते, रखडलेली विकासकामे आणि जागोजागी साचलेला कचरा यामुळे या भागाचे चित्र दिवसेंदिवस बिकट होत आहे.
प्रभाग क्रमांक १२ मधील या जुन्या गावठाण (Old Nagar) भागात काही कामांना गती मिळाली असली, तरी अनेक प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. माळीवाडा वेशीपासून (Maliwada Ves) पंचपीर चावडीपर्यंत (Panchpeer Chawdi) तसेच अंतर्गत भागातील बहुतेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. स्मार्ट एलईडी (Smart LED Bulbs) दिवे बसवले असले तरी त्यातील बहुतांश दिवे बंद असल्याने अंधाराचे (Darkness) साम्राज्य निर्माण होते.
सार्वजनिक शौचालयांची सक्षम व्यवस्था नसल्याने सतत वर्दळ असलेल्या भागात नागरिक आणि भाविकांची मोठी गैरसोय होते. विशाल गणपती मंदिरात (Vishal Ganesh Mandir) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अतिक्रमणांचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आहे.
भुयारी गटार योजना सुरू असली तरी बाबा बंगाली (Baba Bungali) परिसरात ड्रेनेज लाईन वारंवार तुंबते आणि मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येते. अनेक ठिकाणी नियमित सफाई न झाल्याने कचऱ्याचे ढीग साचले असून परिसराच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
माळीवाडा परिसरातील प्रलंबित समस्या
मंगल कार्यालय बंद :
- माळीवाड्यातील महापालिकेचे एकमेव सौभाग्य सदन मंगल कार्यालय (Saubhagya Sadan Mangal Karyalay) दुरुस्तीअभावी अनेक दिवसांपासून बंद.
- नागरिकांनी तातडीने ते सुरू करण्याची मागणी केली.
सार्वजनिक शौचालयाची अडचण :
- जुन्या महापालिका कार्यालयाजवळील एकमेव सार्वजनिक शौचालय अनेक दिवसांपासून बंद.
- शासकीय कामांसाठी किंवा खरेदीसाठी येणाऱ्यांची मोठी गैरसोय.
बेग पटांगणाची दुरवस्था :
- जुन्या महापालिका कार्यालयाजवळील मोठे बेग पटांगण (Beg Ground) कचराकुंडीमध्ये रूपांतरित.
- बंद पडलेले डंपर, तुटलेल्या ट्रॉली, साचलेला कचरा यामुळे परिसरात दुर्गंधी.
- स्वच्छता झाल्यास नागरिकांसाठी उत्तम विहारस्थळ होऊ शकते.
प्रभागातील नागरिकांच्या तक्रारी :
- ड्रेनेज समस्या: बाबा बंगाली परिसरात लाईन वारंवार तुंबते; मैलामिश्रित पाणी रस्त्यांवर आणि घरात शिरते.
- शौचालयाची कमतरता: सार्वजनिक शौचालय बंद असल्याने मोठी गैरसोय.
रुग्णालय सुविधा :
- बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाचे (Balasaheb Deshpande Hospital) अत्याधुनिकीकरण व विस्तारीकरण आवश्यक
- प्रसूतीसाठी आवश्यक सुविधा अपुऱ्या.
- घरकुल योजना (Gharkul Scheme) व शौचालयांची गरज.
- गरीबांसाठी घरकुल योजना राबवावी
- परिसरात सार्वजनिक शौचालयांची आवश्यकता.
प्रभागातील प्रलंबित कामे :
- सर्व रस्त्यांची दुरुस्ती
- मोकळ्या जागांचे सुशोभीकरण
- सार्वजनिक शौचालयांची उभारणी
- नियमित सफाई
प्रभागातील पूर्ण झालेली कामे :
- प्रमुख अंतर्गत रस्ते
- नियमित पाणीपुरवठा
- भुयारी गटार योजना
