मोहटादेवी देवस्थान येथे आता भाविकांना सुविधा आणि विकास आराखड्याला गती


अहिल्यानगर - श्री मोहटादेवी देवस्थानच्या (Mohata Devi Trust) विश्वस्त मंडळातील दहा (१०) विश्वस्तांची नियुक्ती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, यांच्या आदेशाद्वारे नुकतीच करण्यात आली. नवनियुक्त विश्वस्तांच्या प्रथम परिचय बैठकित प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (Chief District Megistrate) अंजू शेंडे यांनी देवस्थानच्या आगामी विकास दिशा, भाविकांना सोयी–सुविधा उपलब्ध करणे व मंदिर (Temple) परिसराचा सर्वांगीण विकास याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

नवनियुक्त विश्वस्तांनी पदसिद्ध विश्वस्त यांचे तसेच न्यासाचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश महेश लोणे यांच्या कुशल नेतृत्वाखाली देवस्थानाच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची व भाविकांच्या सहकार्याने मंदिराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाला प्रतिष्ठा मिळवून देण्याची बांधिलकी व्यक्त केली.

बैठकीत सर्वानुमते मंजूर झालेल्या ठरावांमधील प्रमुख निर्णय :
  • भाविक (Divotees), मोहटे ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा (Free Medical Facilities) उपलब्ध करणे यासाठी रुग्णालय (Hospital) उभारणीचे नियोजन करणे.
  • बाह्य रुग्णसेवा (OPD) तातडीने सुरू करणे.
  • भाविकांच्या मार्फत उत्सवमूर्तीवर अभिषेक सेवा पुन्हा सुरू करणे.
  • भाविकांसाठी विविध धार्मिक पूजाविधी व्यवस्था सुरू करणे.
  • मोहटे ग्रामस्थांच्या सहभागाने वार्षिक उत्सव (Annual Festival) आयोजित करण्यासाठी योजना तयार करणे.
  • देवीच्या सुलभ दर्शनासाठी आधुनिक व शिस्तबद्ध व्यवस्था उभारणे.
  • महाराष्ट्र (Maharashtra) आणि केंद्र सरकारच्या (Central Government) समन्वयाने मंदिर परिसराचा विकास (Development) करून भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करणे.
  • देवस्थानच्या उन्नतीसाठी संकल्पित कार्ययोजना तयार करून अंमलबजावणी सुरू करणे.

यावेळी विश्वस्त बाबासाहेब दहिफळे, शशिकांत दहिफळे, शुभम दहिफळे, अशोक दहिफळे, राजेंद्र शिंदे, ॲड. विक्रम वाडेकर, ॲड. कल्याण बडे, ॲड. प्रसन्न दराडे, श्रीकांत लाहोटी, ऋतिका कराळे आदी उपस्थित होते.

या बैठकीचे सुत्रसंचालन ॲड. विक्रम वाडेकर यांनी प्रास्ताविक शुभम दहिफळे यांनी केले. तर आभार सुरेश भणगे (मुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी व्यक्त केले.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !