अरेरे ! टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ पुन्हा हरला.. 'या' संघानेही चारली पराभवाची धूळ

क्रीडा - टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा ८ गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम खेळताना टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशा केली. २० षटकात ७ गडी गमावून त्यांनी फक्त ११० धावा केल्या. अन् तेथेच भारताचा पुन्हा पराभव होणार, हे चित्र निर्माण झाले होते.


रवींद्र जडेजाने सर्वाधिक नाबाद २६ धावा केल्या. किवी संघाच्या ट्रेंट बोल्टने ३ विकेट्स घेतल्या. उत्तरादाखल विजयासाठी असलेले १११ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने फक्त १४.३ षटकांच्या खेळात गाठले. त्या बदल्यात त्यांनी अवघे २ गडी गमावले होते. गोलंदाजी करण्यातही भारतीय संघ कमकुवत ठरला.

टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सलग दुसरा पराभव झाला आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या संघाने भारताला हरवले होते. आता दुसऱ्या पराभवामुळे भारतीय संघाचे स्पर्धेतील स्थानही धोक्यात आले आहे. कारण आता उपांत्य फेरी गाठणे देखील भारतीय संघाला मोठे कठीण झाले आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !