मुंबई - अगोदर जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीच्या सुट्टयांप्रमाणे परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. पण, तातडीने सुट्टया जाहीर करुन सुट्टया कमी करण्यात आले. त्यामुळे शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक व शिक्षकांचे नियोजन कोलमडले आहे, असा सूर शिक्षक संघटनांनी लावला आहे.
दिवाळी सुट्टीचे घाईघाईत घेतलेल्या निर्णयाने शाळांचे नियोजन कोलमडले आहे, असे महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे म्हणणे आहे. परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी तसे प्रसिद्धीपत्रकच प्रसारमाध्यमाांना दिले आहे. तसेच पुर्वी जाहीर केल्याप्रमाणे १ ते २१ नोव्हेंबर प्रमाणे दिवाळीच्या सुट्टया द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधान व महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना शिक्षक परिषदच्या वतीने देण्यात आले आहे. अत्यंत तातडीने हा निर्णय घेतल्याने सर्व शाळांचे नियोजन कोलमडले. नव्याने काढलेल्या सुट्टयांच्या परिपत्रकाची सक्ती करु नये, अशी शिक्षक परिषदेची मागणी आहे.