अहमदनगर - संघटितपणे गुन्हेगारी करणारे कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांना मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्याचा सपाटा नगर पोलिसांनी लावला आहे. आतापर्यंत सहा ते सात कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांना मोक्का लावला आहे.
एमआयडीसी पोलिसांनी आकाश पांडुरंग शिंदे (वय २६, रा. पाण्याच्या टाकीजवळ, नगर) याच्यासह एकूण सहा जणांच्या टोळीला 'मोक्का' कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.
हा गुन्हा १० मे रोजी घडला होता. हा गुन्हा आकाश पांडुरंग शिंदे व त्याच्या टोळीने संघटितपणे केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्या टोळीविरुध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांचेकडे पाठवण्यात आला होता.
टोळीचा प्रमुख व सदस्य - स्वप्निल ऊर्फ आदित्य अशोक पाखरे (वय २५, रा. नागरदेवळे, ता. नगर), किशोर ऊर्फ ईश्वर दिलीप शिंदे (वय २४, वर्ष, रा. देहरे, ता. नगर), महेश मनाजी ऊर्फ मनोहर शिंदे (वय २८, रा. विळद, ता. नगर), आकाश पांडुरंग शिंदे (वय २६, पाण्याची टाकी ता. जि. नगर), (टोळीप्रमुख), गणेश रमेश शिंदे वय ३०, सागर संजय शिंदे (वय २७, दोघे रा. विळद ता. नगर).
या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे. या टोळीविरुद्ध एमआयडीसी, तोफखाना, नगर तालुका, पौड आदी पोलिस ठाण्यात जबरी चोरी आणि दरोड्यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.