नेवाशात 'या' व्यापाऱ्यावर गोळीबार.. ती गोळी थोडक्यात हुकली म्हणून..

अहमदनगर -  नेवासे येथील जननी ऑईल मिल व्यापारी यांचा मुलगा नीरज मुथा (वय १९) याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. 


मुथा हे कंपनीची रोकड आणि कागदपत्रे घेऊन दोन बॅगसह घरी येत होते. ते घराजवळ आले असताना काही अज्ञात लुटमारांनी त्याला घेरून नीरज यांच्या हातातील बॅग हिसकावण्यायाचा प्रयत्न केला. 

नीरज मुथा यांनी विरोध केल्याने दोन लुटमारांपैकी एकाने नीरजच्या दिशेने बंदुकीतून गोळीबार केला. मात्र सुदैवाने नीरज यांच्या जवळून गोळी गेली. या झटापटीत नीरज यांच्याकडील एक बॅग लुटमारांनी ओढत धूम ठोकली

यावेळी समोर असलेल्या गुन्हेगारांकडे बंदूक असतानाही नीरज यांनी पाठलाग केला मात्र गुन्हेगार फरार झाले. ही घटना नेवासे येथील मार्केट कमिटी परिसरात घडली. 

नीरज मुथा हे वडिलांच्या जननी ऑइल मिल मधून जवळच असलेल्या खडका फाटा रोडवरील आपल्या घराकडे परतत असताना ही घटना घडली. घराजवळ असतानाच झाडीत लपलेले दोघांनी नीरज यांना धमकावत बॅग मागितल्या. 

पण नीरज यांनी प्रतिकार केला. सुदैवाने गुन्हेगारांनी केलेल्या बंदुकीच्या फायर मधे ते बचावले तसेच प्रतिकार केल्याने एकच बॅग लुटमारांच्या हाती लागली. बॅगेत साधारण ८० हजार रुपये आणि कागदपत्रे असल्याचे समजते.

या घटनेची माहिती मिळताच नेवासे पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाजीराव पोवार हे घटनास्थळी पथकासह दाखल झाले. पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे नेवासे येथील व्यापारी वर्गात खळबळ आणि भीतीचे वातावरण आहे. 
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !