वाचनाने माणूस समृद्ध होतो, असे म्हणतात. तसेच वाचनाने तो प्रगल्भही होतो. त्याच्या विचारांच्या कक्षाही रुंदावतात. त्यामुळे माणसाने सतत वाचत रहावे, असेही नेहमी सांगितले जाते. पण नेमके काय वाचावे, आणि कोणत्या लेखकांची पुस्तके वाचावीत? असा प्रश्न नेहमी पडतो.
जो वाचेल, तोच वाचेल, असेही म्हटले जाते. तेही सार्थच आहे. कारण, वाचणारा कधीही त्याचे वाचन वाया जाऊ देत नाही. पण किमान सुरुवातीला किंवा आयुष्यात एकदा का हाेईना, काही पुस्तके वाचलीच पाहिजेत, असे म्हटले जाते. अशाच काही पुस्तकांची यादी तुमच्याशी शेअर करत आहोत.
येथे दिलेली पुस्तकांची यादी सहसा वाचली जाणारी, गाजलेली आणि नेहमी वाचकांच्या चर्चेत असलेली आहेत. परंतु, याशिवायही असंख्य पुस्तके आहेत, ही जी वाचली पाहिजेत. आम्ही काही ठराविक पुस्तकांची यादी शेअर करत आहोत.
पुस्तकाचे नाव आणि पुढे कंसात लेखक
महानायक (विश्वास पाटील)
आई समजून घेताना (उत्तम कांबळे)
मी वनवासी (सिंधुताई सपकाळ)
श्रीमान योगी (रणजित देसाई)
धग (उध्दव शेळके)
वळीव (शंकर पाटील)
तराळ अंतराळ (शंकरराव खरात)
मृत्यूंजय (शिवाजी सावंत)
संभाजी (विश्वस पाटील)
पानिपत (विश्वास पाटील)
छत्रपती शिवाजी महाराज (कृष्णाजी केळुसकर)
शिवचरित्र - एक अभ्यास (सेतुमाधव पगडी)
शिवाजी कोण होता ? (कॉ. गोविंद पानसरे)
दगलबाज शिवाजी (प्रबोधनकार)
पण लक्षात कोण घेतो (हरी नारायण आपटे)
ययाती (वि. स. खांडेकर)
हिंदू (भालचंद्र नेमाडे)
स्वामी (रणजीत देसाई)
एक होता कार्व्हर (विणा गवाणकर)
छावा (शिवाजी सावंत)
फकिरा (आण्णाभाऊ साठे)
बलुतं (दया पवार)
सांस्कृतिक संघर्ष (शरणकुमार लिंबाळे)
खळाळ (आनंद यादव)
आठवणींचे पक्षक (प्र. ई. सोनकांबळे)
झुलवा (उत्तम तुपे)
कोसला (भालचंद्र नेमाडे)
माझे विद्यापीठ (नारायण सुर्वे)
उचल्या (लक्षण गायकवाड)
गोलपिठा (नामदेव ढसाळ)
उपरा (लक्षण माने)
पाचोळा (रा. र. बोराडे)
यश तुमच्या हातात (शिव खेरा)
बळीवंश (डॉ. आ. ह. साळुंखे)
सर्वोत्तम भूमिपुत्र - गोतम बुद्ध (डॉ. आ. ह. साळुंखे)
शिक्षण (जे. कृष्णमूर्ती)
अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम (शंकरराव खरात)
यक्षप्रश्न (प्रा. शिवाजीराव भोसले)
बनगरवाडी (व्यंकटेश माडगूळकर)
तो मी नव्हेच (प्र. के. अत्रे)
आग्नीपंख (ए. पी. जे. अब्दुल कलाम)
अंधश्रद्धा (नरेंद्र दाभोलकर)
आमचा बाप आणि आम्ही (डॉ. नरेंद्र जाधव)
युगंधर (शिवाजी सावंत)
मुसाफीर (अच्युत गोडबोले)
प्रतिइतीहास (चंद्रशेखर शिखरे)
तरूणांना आव्हान (स्वामी विवेकानंद)
ग्रामगीता (संत तुकडोजी महाराज)
तुकोबांचा गाथा (संत तुकाराम महाराज)
प्राचीन भारताचा इतिहास (मा. म. देशमुख)
मध्ययुगीन भारताचा इतिहास (मा.म. देशमुख)
झोत (रावसाहेब कसबे)
राजश्री शाहू छत्रपती (डॉ. जयसिंगराव पवार)
दुनियादारी (सुहास शिरवळकर)
शाळा (मिलींद बोकील)
वपूर्झा (व. पु. काळे)
वामन परत न आला (जयंत नारळीकर)
हसरे दुखः (भा. द. खरे)
शिकस्त (रा. स. इनामदार)
पंखा प्रकाश (नारायण संत)
वनवास (प्रकाश नारायण संत)
शुद्र (सुधाकर गायकवाड)
ह्रदयाची हाक (वि. स. खांडेकर)
अद्वितीय संभाजी (आनंत दारवटकर)
जिजाऊ साहेब (मदन पाटील)
शुद्र पुर्वी कोण होते ? (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
बुध्द आणि त्यांचा धम्म (बाबासाहेब आंबेडकर)
प्रॉब्लेम ऑफ रूपी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
शेतकऱ्याचा असूड (ज्योतिबा फुले)
गुलामगिरी (ज्योतिबा फुले)
बुधभूषण (छत्रपती संभाजी महाराज)
संस्कृती (इरावती कर्वे)
शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण - महम्मदी की ब्राह्मणी (कॉ. शरद पाटील)
दास शुद्रांची गुलामगिरी (कॉ. शरद पाटील)
अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र (कॉ. शरद पाटील)
छ. शिवाजी महाराजांचे चिकित्सक चरित्र (वा. सी. बेंद्रे)
पार्टनर (व. पु. काळे)
अकथीत सावरकर (मदन पाटील)
झुळूक (मंगला गोडबोले)
तुकाराम दर्शन (सदानंद मोरे)
पांगीरा (विश्वास पाटील)
लसावी (डॉ. नरेंद्र जाधव)
लोकायत (स. रा. गाडगीळ)
मार्क्सवाद फुले आंबेडकरवाद (कॉ. शरद पाटील)
झाडाझडती (विश्वास पाटील)
झोंबी (आनंद यादव)
अमृतवेल (वि. स. खांडेकर)
आई (मॅक्झिम गॉर्की)
नाझी भस्मासुराचा उदयास्त (वि. ग. कानिटकर)
एक माणूस एक दिवस (ह. मो. मराठे)
अक्करमाशी (शरणकुमार लिंबाळे)
माणुसकीचा गहिवर (श्रीपाद माटे)
चकवा चांदण (मारूती चितमपल्ली)
जागर (प्रा. शिवाजी भोसले)
पावनखिंड (रणजित देसाई)
हिंदू संस्कृती आणि स्त्री (डॉ. आ. ह. साळुंखे)
आस्तिकशिरोमणी चार्वाक (डॉ. आ. ह. साळुंखे)
विचार सत्ता (डॉ. यशवंत मनोहर)
खपले देवाच्या नावाने (विठ्ठल साठे)
काजळ माया (जी. ए. कुलकर्णी)