MBP Live24 - क्रिकेट जगतामध्ये प्रत्येक दिवस ऐतिहासिक आहे. आजवरच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये वर्षातल्या प्रत्येक दिवशी काही ना काही मोठी गोष्ट घडलेली आहे. यापैकी सचिन तेंडूलकर हा असा क्रिकेटपटू आहे, ज्याच्या नावावर सर्वाधिक विक्रम आणि सर्वाधिक ऐतिहासिक कामगिरी आहेत. आजचा दिवसही त्याच्या दृष्टीनेच आठवणीत राहणारा आहे..
हाच तो दिवस होता (दि. १६ नोव्हेंबर) ज्या दिवशी क्रिकेटच्या जगातील सचिन युगाचा अंत झाला. याच दिवशी सचिन तेंडूलकर याने आपली कारकीर्द थांबवली होती. सचिनने आपल्या २४ वर्षांची कारकीर्दीतला अंतिम सामना आजच्या दिवशी खेळला होता. त्यानंतर सचिन खूप भावूक झाला होता.
वयाच्या सोळाव्या वर्षी तो मुंबईतल्या वानखेडे मैदानावर क्रिकेटचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर अखेरचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. या सामन्यात सचिनने ७६ धावा काढल्या होत्या. बाद झाल्यानंतर त्याने आकाशाकडे पाहिले. यावेळी तो खूप भावूक झाला होता.
सचिनने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत २०़० कसोटी सामने खेळला. त्यात त्याने १५ हजार ९२१ धावा काढल्या. तर ४६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १८ हजार ४२६ धावा केल्या. सचिन तेंडूलकरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ५१ आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९ शतके आहेत.