काय सांगता ! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले ? काय आहे नेमके वास्तव..

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे ते रुग्णालयात अॅडमिट झाले आहेत. तोवर मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. 

परंतु, याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. 

आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजेस आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये,  त्यात कुठलेही तथ्य नाही, असे आवाहन एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

'तो' खोडसाळपणा कोणी केला ? 

एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून मुख्यमंत्री पदाच्या कार्यभाराबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यात मुख्यमंत्री पदाचा कार्यभाराचे वृत्त चुकीचे व खोडसाळपणा करणारे असल्याचे म्हटले आहे. मात्र, हा खोडसाळपणा कोणी केला, याबाबत सरकारच्या वतीने कोणीही बोलायला तयार नाही.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !