अहिल्यानगर - विळद घाट येथील मातोश्री वृद्धाश्रमात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. वृद्धाश्रमातील लोकांनी चेष्टा केल्याच्या किरकोळ कारणावरून एका ५४ वर्षीय इसमाने वृद्धांना काठीने जबर मारहाण केली.
या हिंसक हल्ल्यात (Violence attack) गंभीर जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एम.आय.डी.सी. पोलिसांनी (MIDC Police Station) तत्परता दाखवत आरोपीला अटक (Accused Arrested) केली आहे.
नक्की काय घडली घटना? २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. राजू तुकाराम घुले (वय ५४ वर्षे, रा. मातोश्री वृद्धाश्रम, विळदघात) याला वृद्धाश्रमातील इतर लोक आपली चेष्टा करतात असा राग होता.
या रागाच्या भरात त्याने वृद्धांना चालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काठीने (ज्याला वरच्या बाजूला प्लास्टिकचा दांडा व खाली लोखंडी भाग असतो) आश्रमातील इतर ८ वृद्धांवर प्राणघातक हल्ला केला.
या हल्ल्यात संतोष पिरंगळ, लिंबराज फिसके, साहेबराव भवर, बाळासाहेब घाडगे, गोरख फुंदे, गणेश घोडके, दत्तात्रय हारके आणि मंकाळेश्वर हेने हे सर्व वृद्ध गंभीर जखमी झाले.
उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू - मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वृद्धांपैकी दत्तात्रय हारके आणि मंकाळेश्वर हेने या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला.
या घटनेची माहिती मिळताच दिलीप मांगीलाल चोरडिया (रा. नगर पाथर्डी रोड, भिंगार) यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाच्या पुढील तपासाला (Investigation) सपोनि हेमंत थोरात यांनी वेग दिला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद (Crime Register) करण्यात आला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम नुसार गुन्हा दाखल करत राजू तुकाराम घुले यास तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे.
ही कारवाई (Police Action) पोलीस अधीक्षक (SP) मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) हेमंत थोरात व पथकाने केली आहे.
या पथकात पोसई अजय कौटे, पोसई खिळदकर, सफौ. राकेश खेडकर, पोहेकॉ नरोटे, फोलाणे, रोहोकले, राजु सुद्रीक, खेडकर, पोना पालवे, फुंदे, सुरज देशमुख, दहिफळे, जाधव, केदार, खेडकर, पोकों हरदास, पोकों गवारे यांनी यांचा समावेश आहे.
