हॉटेल गुडलक हत्या प्रकरण : तिसऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

​अहिल्यानगर - शहरानजीकच्या एम.आय.डी.सी. (MIDC) पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल गुडलक येथे घडलेल्या बहुचर्चित हत्या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात एम.आय.डी.सी. पोलिसांना यश आले आहे.

विठ्ठल गंगाराम काळे (रा. खोसपुरी, ता. जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या तिसऱ्या आरोपीचे नाव आहे. विशाल महादेव ऊरुडे (वय २६, व्यवसाय - ड्रायव्हर, रा. नेप्ती नाका, नालेगाव, अहिल्यानगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिलेली आहे.

फिर्यादीनुसार, ऋषिकेश आव्हाड हे पांढरी पुल येथील 'हॉटेल गुडलक' गणपती विसर्जन (Ganpati Visarjan) नंतर सुरू करणार होते. त्या हॉटेलची पूर्वतयारी करण्यासाठी व नंतर मॅनेजर (Manager) म्हणून काम करण्यासाठी फिर्यादीचा भाऊ सागर महादेव ऊरुडे (वय २८) याला सोबत नेले होते. 

​दिनांक २५ सप्टेंबर रोजी रात्री ११:५७ वाजताच्या सुमारास सागर आव्हाड व शेखर खंडागळे यांनी कोणत्याही कारणाशिवाय सागर ऊरुडे यास गंभीर मारहाण केली. या मारहाणीत सागर ऊरुडे याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात आणखी एक आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

​या गुन्ह्याचा तपास करत असताना आधीच्या दोन आरोपींना न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी (Police Custody) सुनावली आहे. तपासादरम्यान या गुन्ह्यात विठ्ठल गंगाराम काळे याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यास ताब्यात घेतले व चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली (Confession) दिली. त्यामुळे त्यास अधिकृतपणे अटक (Arrest) करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) अमोल गर्जे करत आहेत.

​या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) हेमंत थोरात, PSI अमोल गर्जे, तसेच पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, शैलेश रोहोकले, देविदास खेडकर, राजु सुद्रीक, दिपक फुंदे, नवनाथ दहिफळे, किशोर जाधव, संपत खेडकर, प्रशांत धुमाळ, राहुल गुंडू आणि अरुण सांगळे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

येथे क्लिक करुन इंस्टाग्रामवर फॉलो करा

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !