मुंबई - राज्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी संख्येत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज एकाच दिवशी ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत ७७ हजार ४५३ रुग्ण बरे झाले आहेत.
आजही मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक २८४४ रुग्ण घरी सोडले. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.