बालकांना खळखळून हसताना पाहण्याइतका आनंद इतर कशातच नाही. व्यंगचित्र प्रात्यक्षिका दरम्यान मात्र हा आनंद मला प्रत्येकवेळी मिळत असतो.
कोरोनामुळे लादल्या गेलेल्या मधल्या दोन वर्षांच्या ‘ऑनलाईन’ कालखंडानंतर प्रथमच विद्यानिकेतन विद्यालयात व्यंगचित्र प्रात्यक्षिक देता आले.
यावेळी मुलांचा उत्साह अवर्णनिय होता. आपल्या कलेमुळे मुलांना खळखळून हसता आले. त्यांना काही शिकता आले याचे मनापासून समाधान वाटते.
डॉ. प्रेरणा शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरणानिमित्त हे प्रात्यक्षिक मुख्याध्यापक विनोद रोहमारे यांनी आयोजित केले होते.
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही यावेळी भरविण्यात आले होते. मोठ्यांनाही विचार करायला भाग पडेल अशा कल्पना या लहानग्यांनी चित्रातून मांडल्या होत्या.
विद्यानिकेतनसारखे उपक्रम सर्वच शाळा व्यवस्थापनांनी राबविल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासास हातभार लागेल.