अहमदनगरचे नवे 'कलेक्टर ऑफिस' आजपासून लोकांच्या सेवेत

अहमदनगर - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारत आजपासून लोकांच्या सेवेत दाखल होत आहे. या इमारतीचा उद्घाटन समारंभ आज २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.


नगर-औरंगाबाद रोडवर शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे नवे जिल्हाधिकारी कार्यालय असणार आहे. येथून जवळच महापालिका, पोलिस अधीक्षक कार्यालय, जिल्हा न्यायालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहेत.

जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले व अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी हे  या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत. मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, यावेळी उपस्थित राहणार आहेत.

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हे नूतन इमारत लोकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या एकाच प्रशस्त इमारतीत महसूल विभागाच्या सर्व शाखा असणार आहेत. खासदार सुजय विखे, तसेच जिल्ह्यातील विधानसभा व विधानपरिषदचे सर्व सदस्य व विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे, खासदार सदाशिवर लोखंडे, हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !