जमिनीवर लिज पेंडन्सी टाकण्यासाठी पैसे घेऊन माघार घेणे व एका बँकेच्या फसवणुकीचे प्रकरण केली, ते उजेडात न येण्यासाठी प्रकाश पोपट शेटे याच्यासह अज्ञात दोघांनी १० लाख रुपयांची मागणी केली, अशी फिर्याद पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र गुगळे यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली आहे.
गुगळे यांच्या फिर्यादीवरुन सोनई पोलिसांनी शेटे यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. गुगळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सोनई येथील मार्केट कमिटीच्या ठिकाणी शेटे यांनी वेळोवेळी कर्ज फसवणूक प्रकरणी दहा लाख रुपये दे, नाहीतर प्रकरण उजेडात आणेल, अशी धमकी दिली.
या भीतीपोटी गुगळे यांनी त्यांचा व्यवस्थापक अमोल शिंदे यांच्याकडे ५ लाख रुपयांचा चेक दिला. स्टेट बँकेतून ५ लाख रुपये काढून सचिन पवारकडे दिले. ही रोकड फिर्यादी यांच्या प्लॉटच्या मागच्या बाजूला मार्केट कमिटी येथे दिले. त्याच वेळेस दोघे जण तोंडाला मफलर बांधून विनानंबर मोटारसायकल वरून आले.
ते म्हणाले की, प्रकाश भाऊ दिल्लीला आहे, तु त्याचे मिटवणार आहे की नाही एकदाच सांग, नाहीतर तुझा कायमचा काटा काढू.. असे म्हणत गुगळे यांना शिवीगाळ व धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी मागितली. या गुन्ह्याचा पुुढील तपास फाैजदार मिसाळ हे करत आहेत.