गुप्तवार्ता अधिकारी कृष्णा विधाते यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान

अहमदनगर - राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलिस उपनिरीक्षक तथा गुप्तवार्ता अधिकारी कृष्णा बबनराव विधाते यांना नुकतेच पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. विधाते हे अहमदनगर पोलिस दलात आहेत. त्यांना हा सन्मान प्राप्त झाल्यामुळे अहमदनगर पोलिस दलासह नगर जिल्ह्याचीही मान अभिमानाने उंचावली आहे.


पोलिस दलात कौतुकास्पद व प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल विधाते यांना हा सन्मान मिळाला आहे. पोलिस महासंचालक कार्यालय, मुंबई येथे 'पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह २०२१' या पदकाने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

पोलिस उपनिरीक्षक कृष्णा विधाते हे मूळ अहमदनगर पोलिस दलातील होतकरू अधिकारी असून त्यांचे उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची राज्य गुप्तवार्ता विभागात नेमणूक करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील महत्वाच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक व इतर महत्वाच्या घटनांबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी अवगत केले आहे.

राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त तथा अतिरिक्त पोलिस महासंचालक आशुतोष डुंबरे, राजेश प्रधान (विशेष पोलीस महानरीक्षक, सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा विभाग, महाराष्ट्र), सुनील कोल्हे (सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ),  तसेच राजेंद्र मगर, (सहायक आयुक्त), मुख्य गुप्तवार्ता अधिकारी प्रवीण देवकर, अहमदनगर व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी त्यांच्या सन्मान सोहळ्याला उपस्थित होते.

सन २०१४ व २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यांनी वेळोवेळी प्राण धोक्यात घालून कामगिरी बजावलेली आहे. त्यांना मिळालेल्या पोलिस सन्मान चिन्हाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !