वृत्तसंस्था - काझीकाेडा (केरळ) येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या विमान अपघातात दोन पायलट ठार झाले. त्यापैकी एक होते विंग कमांडर कॅप्टन दीपक वसंत साठे. त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देत विमानातील प्रवाशांचे प्राण वाचवल्याचे समोर आले आहे. विमानातील इंधन संपावे म्हणून विमानाने एअरपोर्टला तीन फेऱ्या घातल्या. त्यामुळे विमान अपघाताची तीव्रता कमी झाली.
कोझिकोड विमान अपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसचे वैमानिक कॅप्टन दीपक वसंत साठे आणि सह-पायलट अखिलेश कुमार यांनीही प्राण गमावले. कॅप्टन वसंत साठे हे देशातील एक उत्कृष्ट पायलट पैकी एक मानले जात होते.
दीपक यांचे मित्र नीलेश साठे यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, दिपकने कशाप्रकारे प्लेनला आगी लागण्यापासून वाचवले. 'प्लेनच्या लँडिंग गियर्सने काम करणे बंद केले होते. इंधन संपावे म्हणून दीपक यांनी एअरपोर्टला तीन फेऱ्या मारल्या. तीन राउंडनंतर प्लेन लँड केले.
राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या कोर्समध्ये कॅप्टन साठे यांना सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर त्यांनी एअरफोर्स अकादमी जॉइन केली. येथे त्यांनी पायलट कोर्समध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आणि त्यांना ''सोर्ड ऑफ ऑनर'' ने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचल्याचे समोर आले आहे.