अहमदनगर - सावित्रीबाई जोतीराव फुले जयंती निमित्ताने स्नेहालय संचलित चाईल्ड लाईन आणि ऊर्जा बालभवन, भिंगार यांनी बालके आणि वयस्कर महिलांसोबत उत्कृष्ट कार्यक्रम घेतला. सावित्रीबाई ज्योतीराव फुले यांच्या कार्याची माहिती बालकांना व महिलांना सांगण्यात आली.
सावित्रीबाई जोतीराव फुले (३ जानेवारी, इ.स. १८३१ - १० मार्च, इ.स. १८९७) या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
सावित्रीबाई यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती यांनी १८४८ मध्ये भिडे वाड्यात पुण्यात मुलींच्या पहिल्या शाळेची स्थापना केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरूवातीच्या शाळांपैकी एक होती.
सोमवारी स्नेहालय संचलित चाईल्ड लाईन अहमदनगर आणि ऊर्जा बालभवन येथे आगळ्यावेगळ्या प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यामध्ये बालभवनचे समन्वयिका निलोफर शेख यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. गुलनाज सय्यद यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकाळातील सर्व माहिती बालकांना दिली.
भगत सर यांनी शिक्षणावर मार्गदर्शन केले. चाईल्ड लाईनचे समुपदेशक अलीम पठाण यांनी बालकांना बालविवाह व चाईल्ड लाईनची माहिती प्रसारित केली. संपूर्ण कार्यक्रमानंतर वृद्ध महिलांना साड्याचे वाटप करण्यात आले. तर बालकांना खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार निलोफर शेख यांनी मानले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी व्हावे म्हणून बालभवन टीम गुलनाज सय्यद, अंजुम शेख, सुप्रिया सदलापूरकर यांनी परिश्रम घेतले.