आज प्रपोज डे. म्हणजे एखाद्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करणं.. आपल्या हृदयाचा प्रस्ताव देणं.. भावना प्रकट करण्याकरिता हा दिवस साजरा करतात. हल्ली सोशल मिडियामुळे मुलमुली एकमेकींकडे आकर्षित होतात. न पहाता न भेटता, पूर्ण माहिती नसतानाही आपली आयुष्य उध्वस्त करताना दिसतात.
प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नाहीच. तो एक सोहळा असतो एकमेंकाचा सन्मान करण्याचा, मनाची जपणूक करण्याचा. पण केवळ भंपकपणाला कसे भुलतो आपण हे बघतच आहोत. एखादीला प्रेमाचे अश्लिल मेसेज पाठवत रहायचं ती पटते का आपल्याला हे चाचपत रहायचं. हे मात्र आपल्या बहिणीबरोबर होऊ द्यायचं नाही. म्हणून हीच मुल बहिणीच्या मागे उभी राहतात.
समोरच्याला फसवणे म्हणजे प्रेम नसतेच. आपल्या जोडीदाराच्या आवडीनिवडी निदान माहिती तरी असाव्यात. एखादीला प्रेमाचे सार्वजनिक प्रदर्शन आवडत नाही. त्याचा सन्मान जोडीदाराने करायला हवा. समोरच्याचा नकार असेल तर नाही म्हणजे नाहीच हे समजून घ्यायला हवं. उगाचच लंपटपणा करुन मुलींना त्रास देऊ नये. तेव्हा प्रपोज होऊ द्या पण समोरच्याचे मन जाणून.!
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)