अनिरुध्द तिडके (अहमदनगर) - 'भारतीय संविधान : एक आकलन' या विषयावर झालेल्या निबंध स्पर्धेची 'सम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्येंद्र तेलतुंबडे यांनी जाहीर केला. सम्राट प्रतिष्ठान आयोजित केलेल्या या निबंध स्पर्धेत विविध विभागात मिलिंद मानकर, एम. जी. साळवे, दयाराणी खरात यांना प्रथम क्रमांकाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.
सविस्तर निकाल याप्रमाणे - प्रबुद्ध- सम्राट पुरस्कार - प्रथम क्रमांक : मिलिंद मानकर (नागपूर), द्वितीय क्रमांक - बी. वाय. जगताप (दौंड), तृतीय क्रमांक : संजय रामचंद्र साळुंखे (पुणे)
भूमीपूत्र - सम्राट पुरस्कार - प्रथम क्रमांक : एम. जी साळवे (राहुरी), द्वितीय क्रमांक :-भाऊसाहेब विश्वनाथ मोकळ (संगमनेर), तृतीय क्रमांक : बलभीम तुकाराम जावळे (जामखेड),
क्रांती सम्राट पुरस्कार : प्रथम क्रमांक : दयाराणी विलास खरात (सातारा), व्दितीय : गौरी बलभीम जावळे (जामखेड), तृतीय क्रमांक - संघमित्रा सोनारे-मेश्राम (रायगड ),
निबंध स्पर्धेचे परीक्षण वाचकपीठचे समीक्षक प्राचार्य चंद्रकांत भोसले आणि रयत शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक अनुसंगम शिंदे यांनी केले.
परीक्षण करताना बहुतेक निबंध वाचनीय आहेत. पुरस्कारार्थी निवडताना शब्द मर्यादा, विषय आकलन, मांडणी, नाविन्य, उपयुक्तता आणि सृजनशीलतेला प्राधान्य दिल्याचे प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी प्रतिपादन केले.
या स्पर्धेत १२१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. त्यामुळे पुरस्कार संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सम्राट प्रतिष्ठानच्या महासचिव छाया गायकवाड यांनी दिली. या पुरस्काराचे वितरण एप्रिल महिन्यात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष बबनराव अहिरे यांनी सांगितले.
तसेच जिल्ह्यातील निवडक साहित्यिकांचा गौरव करणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रा. मेघराज बचुटे यांनी दिली आहे. यशस्वी स्पर्धकांचे मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार लहू कानडे, कॉ. धनाजी गुरव, अॅड. प्रसाद सांगळे, डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे सचिव शिरीष गायकवाड, यांनी अभिनंदन केले आहे.
तसेच पत्रकार संजय संसारे, तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे, एॅड.संतोष गायकवाड, संध्या मेंढे, संतोष जाधव, राजेंद्र पटेकर, मनिषा गायकवाड, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे डॉ. जालिंधर घिगे, सहसचिव रोहित तेलतुंबडे आदिंनी सहभागी व यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन केले.