कौलारू घरांच्या दाट वस्तीतून समुद्राकडची चिंचोळी वाट..
उंचच उंच नारळाची झाडे..
सुकलेल्या पालापाचोळा उडवित चालणारी आपली पावलं..
अन् हळूच झाडांच्या या गर्दीतून नजरेला दिसणारा अथांग समुद्र किनारा..
लाटांची गाज..
घरांभोवती लाकडी पट्टीने सजवलेला व्हरांडा..
झोपाळा...
वातावरणाला साजेसा ४० वॉल्टच्या बल्बचा पिवळा प्रकाश..
नीरव शांतता..
मधनंच कुणाचं तरी एखादं वाक्य..
सळसळ..
या शांततेत...
यातुन वाट काढत दिसणारा सागर...
किनाऱ्यावरील खडकांची रास...
अन् त्यावर होत असलेला लाटांचा अभिषेक...
लांब लांब नजर टाकावी...
जहाजांचे लुकलुकते दिवे...
कितीही वेळा यावं..
इथेच रमावं...
रहावं...
उसळत्या लाटा..
पायाशी खेळताना..
आता ओळखीची झालीत...
लांबवर अरुण दातेंच "दिवस तुझे हे फुलायचे..." कानी पडावं..
किती सुंदर आहे हे जग..
निसर्गाचे वरदान..
त्याचं देणं...
चालत रहावे..
विस्तीर्ण किनाऱ्यावरून..
ओली पावलं मागे ठेवून...
ठशासारखी..
ना जगाची चिंता, ना स्वतःची..
जगण्याचे संदर्भ भेटून जावेत,
झोपाळ्यावर हळूवार झोके घेताना..
- जयंत येलुलकर (अहमदनगर)